घर महाराष्ट्र "शरद पवारांनी मोठे केले ते सर्व..."; 'या' नेत्याचा छगन भुजबळांना टोला

“शरद पवारांनी मोठे केले ते सर्व…”; ‘या’ नेत्याचा छगन भुजबळांना टोला

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बीडच्या भाषणातून टीका केली. यानंतर छगन भुजबळ यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात आंदोलन करत त्यांचा पुतळा जाळला. ज्यांना ज्यांना शरद पवारांनी मोठे केले ते सर्व नेते पवारांच विसरून सत्तेत मस्त झाले, अशी टीका   राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली आहे.

महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यात दलित तरुणांना झाडावर उलट टांगून मारहाण केली या घटनेचा साधा निषेध ही बीडच्या सभेमध्ये जमलेल्या मंत्र्यांनी केला नाही, अशी खंत महेश तपासे यांनी बोलून दाखवली. राज्यातलं नेतेमंडळींना राज्यात वाढत चाललेल्या असहिष्णुतेच्या घटना दिसत नाहीत हे दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया महेश तापसेंनी दिली.

पवारांनी मोठे केलेल नेते…

- Advertisement -

पवार साहेबांच्या राजकीय विचारा विपरीत जाऊन काही नेते सरकारमध्ये समाविष्ट झाले व आता त्यांचं अंतर्मन त्यांना खात असल्यामुळे त्यांच्यावर उत्तर सभा घेण्याची वेळ आली आहे, असा टोला महेश तपासे यांनी लगावला.  बीड मधील सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर झालेल्या टीकेचा खरपूस समाचार महेश तपासे यांनी घेतला. ते पुढे म्हणाले की ज्यांना ज्यांना शरद पवारांनी मोठे केले ते सर्व नेते पवारांना विसरून सत्तेत मस्त झाले. आपली वैचारिक बांधिलकी धर्मनिरपेक्षते सोबत आहे. याचा विसर काही नेत्यांना पडला आणि अनेकांनी व्यक्तिगत कारणामुळे भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असावा, असेही तपासे म्हणाले.

शरद पवार देशातले एक वरिष्ठ नेते आहेत. ह्या नेतृत्वावर वेळोवेळी आरोप करून त्यांचं राजकीय महत्त्व कमी करण्याचा डाव राज्यातच नव्हे तर देशपातळीवर अनेक वेळा झाला. आपल्यावर होणाऱ्या आरोपांमुळे पवार कधी डगमगले नाही व सोडून गेलेल्या साथीदारांची फिकीर त्यांनी कधीच केली नाही त्या उलट प्रत्येक वेळेस नवीन नेतृत्व राज्यात उभा करण्याची कामगिरी पवारांनी केली याची आठवण तपासे यांनी यावेळी करून दिली.  शरद पवार यांनी पक्षाची राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे लोकशाहीला व धर्मनिरपेक्षतेला घातक असलेल्या पक्षासोबत जाणार नाही यापूर्वीच स्पष्ट केले आहे त्यामुळे पवार साहेबांच्या भूमिकेवर संशय घेण्याचं कारण नाही.

- Advertisement -

हेही वाचा – छगन भुजबळांचे नाव न घेता अजित पवार म्हणाले; “राजकीय भूमिका मांडताना…”,

मविआ भक्कम करण्याच्या दृष्टिकोनातून कार्य सुरू

पक्षातील आमदार गेले तरीही पवारांनी भूमिका सोडली नाही व महाविकास आघाडी भक्कम करण्याच्या दृष्टिकोनातून कार्य सुरू ठेवले आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचार कधीही साहेब सोडणार नाही याची खात्री असल्यानेच आज जनता पवारसोबत आहे असेही तपासे पुढे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना राज्यात मिळत असलेल्या प्रतिसादामुळेच भाजप व यांच्या मित्र पक्षाची डोकेदुखी वाढली असून पक्ष व नेते फोडण्याचा त्यांनी चंग बांधला आहे.

हेही वाचा – शरद पवारांवरील टीकेनंतर छगन भुजबळांविरोधात ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

नेत्यांनी कितीही विचारांसोबत फारकत घेतली तरीही कार्यकर्ता विचार सोडत नाही असा महाराष्ट्राचा राजकीय इतिहास आहे. 2024 च्या निवडणुकीमध्ये देशातील तरुण पिढी ही मोदींच्या जुमल्यांना बळी पडणार नाही ही वस्तुस्थिती महेश तपासे यांनी अधोरेखित केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष जिल्हा प्रभारी यांची मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात बैठक बोलवण्यात आली. या बैठकीमध्ये आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक, आणि पक्ष संघटना बांधणी या संदर्भातील आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील घेणार असल्याची माहिती तपासे यांनी माध्यमांना दिली.

- Advertisment -