घरमहाराष्ट्र'महाराष्ट्र कॉंग्रेसमधील गैरसमज दूर होणार; थोरात रायपूर अधिवेशनाला हजर राहणार'

‘महाराष्ट्र कॉंग्रेसमधील गैरसमज दूर होणार; थोरात रायपूर अधिवेशनाला हजर राहणार’

Subscribe

पाटील यांनी कॉंग्रेस नेते व आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा स्विकारलेला नाही. कॉंग्रेस अध्य़क्ष मल्लिकार्जुन खरगे व सरचिटणीस वेणुगोपाल यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. त्यांच्यासमोर सर्व गोष्टी ठेवलेल्या आहेत. बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली आहे. थोरात हे मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यासोबतही याविषयी चर्चा होईल.

मुंबईः महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये कोणतेही वाद नाहीत. सर्व सुस्थितीत आहे. जे काही गैरसमज आहेत ते लवकरच दूर केले जातील, असे कॉंग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी रविवारी स्पष्ट केले. कॉंग्रेस नेते व आमदार बाळासाहेब थोरात हे रायपूर येथे होणाऱ्या कॉंग्रेसच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही पाटील यांनी दिली.

पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा स्विकारलेला नाही. कॉंग्रेस अध्य़क्ष मल्लिकार्जुन खरगे व सरचिटणीस वेणुगोपाल यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. त्यांच्यासमोर सर्व गोष्टी ठेवलेल्या आहेत. बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली आहे. थोरात हे मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यासोबतही याविषयी चर्चा होईल.

- Advertisement -

थोरात यांच्या हाताला दुखापत झाली आहे. तरीही मी त्यांना रायपूर येथील कॉंग्रेसच्या अधिवेशनाला उपस्थित राहण्याची विनंती केली आहे. ते अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत, असे पाटील यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविषयी अनेकांच्या तक्रारी आहेत. थोरात यांनीही पटोले यांची तक्रार केली असेल या प्रश्नाचे उत्तर देताना पाटील म्हणाले, याची अधिक माहिती मी देऊ शकत नाही. पण कॉंग्रेस हे कुटुंब आहे. कुटुंबात वाद हे होतच असतात. गैरसमज होतात. त्यामुळे हे गैरसमज लवकरच दूर केले जातील. माझे बोलणे सुरु आहे.

नाशिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत थोरात व त्यांच्या कुटुंबियांना नाहक त्रास देण्यात आला याबाबत पाटील म्हणाले, थोरात यांना जो त्रास झाला. त्यांना विश्वासात घेतले गेले नाही. त्यानंतर जो काही प्र्कार घडला, याची स्वविस्तर माहिती हायकमांडला देण्यात आली आहे. लवकरच त्यावर सविस्तर चर्चा होईल.

- Advertisement -

पुढे पाटील म्हणाले, सत्यजित तांबे यांच्याविषयी बैठकीत चर्चा झालेली नाही. त्यांचा उमेदवारी अर्ज. नंतर झालेली निवडणूक या सर्व मुद्द्यांवर चर्चा झालेली नाही. आम्ही वेगळ्या विषयावर चर्चा केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -