घरमहाराष्ट्रबाजार समितीचे बियाणे विकले महाबीजच्या नावाने, बच्चू कडू यांचा आरोप

बाजार समितीचे बियाणे विकले महाबीजच्या नावाने, बच्चू कडू यांचा आरोप

Subscribe

खरीप हंगाम तोंडावर असताना राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. गतवर्षी उत्पादन केलेले बियाणे संपल्यानंतर महाबीजने अक्षरश: बाजार समितीतले बियाणे खरेदी करून ते महाबीजचे (Mahabeej) बियाणे असल्याचे सांगत विकले, असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. महाबिजच्या बियाणांच्या किंमती वाढल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी हा गौप्यस्फोट केला.

फसवणून टाळण्यासाठी अनुदानाचा आधार काढावाच लागेल –

- Advertisement -

बियाणे केवळ सबसिडीवर मिळते म्हणून शेतकऱ्यांचा या बियानाकडे कल असतो. ही एखादा वाईट मित्र मिळाला तर दारूची सवय लागते तशी सरकारने आम्हाल सबसिडी देऊन ही सवय लावल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती हालाखीची असल्याने ही वेळ शेतकऱ्यावर आली आहे. मात्र, उत्पादन वाढीसाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदानाचा आधार काढावाच लागणार आहे. शेतकऱ्यांनी गटाने बियाणे निर्माण केले तर एक दिवस या कंपन्या बंद पडतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

बियाणे निर्मितीचा आव अणून कंपन्या कोट्याधीश –

- Advertisement -

बियाणे निर्मितीचा आव आणून काही कंपन्या केवळ हंगामात कोट्यावधी रुपये कमावतात. त्यामुळे शेतकऱ्यांनीच बिजोत्पादन कार्यक्रमाचे ज्ञान घेऊन शेतकरी गट करुन त्याची विक्री केली तर उत्पादनात वाढ होईल आणि कंपन्यांच्या मनमानी कारभारातून शेतकऱ्यांची सुटका होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येत गटशेतीवर लक्ष केंद्रीत करावे असेही आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.

कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन महत्वाचे –

शेती व्यवसायासाठी शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेतले तर शेती उत्पादनात वाढ होते. शेतकऱ्यांमध्ये एक विश्वास निर्माण होतो. एखाद्या मंत्र्याने जर काम सांगितले आमि त्याबाबत अधिकारी नकारात्मक असेल तर ते काम होऊ शकत नाह. अधिकाऱ्यांची भूमिका फार महत्त्वची असून प्रशासन आणि शेतकरी यांच्यातमधील तो दुआ असतो. याचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे असे मत बच्चू कडे यांनी व्यक्त केले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -