घरमहाराष्ट्रयुतीचा उद्या मराठवाड्यात मेळावा

युतीचा उद्या मराठवाड्यात मेळावा

Subscribe

शिवसेना भाजप युतीच्या या मेळाव्याला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस उद्या रविवार १७ मार्च रोजी मराठवाडयातील आठ लोकसभा मतदार संघातील शिवसेना भाजप पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी १०.३० वा. श्रीहरि पॅव्हेलियन, सुतगिरणी रोड येथे होणाऱ्या या मेळाव्यास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, शिवसेना नेते खा.चंद्रकांत खैरे, भाजप प्रदेश अध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, पालकमंत्री एकनाथराव शिंदे, समन्वय समितीचे प्रमुख राज्यमंत्री अर्जुन खोतकर, ग्रामविकास मत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, कौशलविकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, वैद्यानिक विकास महामंडळाचे डॉ.भागवत कराड यांच्यासह खासदार, आमदार आणि शिवसेना, भाजपाचे मराठवाडा स्तरीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

संभाजीनगर,जालना,परभणी,हिंगोली,नांदेड,बीड,लातुर आणि धाराशिव या लोकसभा मतदार संघातील शिवसेना, भाजपचे जिल्हा, उपजिल्हा, तालुका उपतालुका स्तरीय पदाधिकारी खासदार, आमदार, महानगरपालिका, नगरपालीका, जिल्हापरीष्द सदस्य, युवासेना तसेच भारतीय जनता युवा मोर्चा, महिला आघाडी आणि अंगीकृत संघटनांचे जिल्हा त्याचप्रमाणे तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे अवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी केले आहे.

- Advertisement -

प्रचार कार्यालय उद्घाटन

सदर मेळाव्यानंतर संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना, भाजप युतीच्या समर्थनगर येथील प्रचार कायालयाचेही उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -