महाराष्ट्र भवनासाठी बेळगाव, बंगळूरूमध्ये जागा द्या – संजय राऊत

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी काही गावांसाठी सोलापुरात हक्क सांगण्यास सुरुवात केली म्हणून तुम्ही सोलापुरात कर्नाटक भवन उभं करायचं म्हणत आहात, मात्र सोलापुरात किंवा कोल्हापुरात त्यासाठी कर्नाटक भवन बांधणार असाल तर आम्हालासुद्धा बेळगावात महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी जागा द्या, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

shiv sena sanjay raut slams eknath shinde devendra fadanvis on corruptions

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी काही गावांसाठी सोलापुरात हक्क सांगण्यास सुरुवात केली म्हणून तुम्ही सोलापुरात कर्नाटक भवन उभं करायचं म्हणत आहात, मात्र सोलापुरात किंवा कोल्हापुरात त्यासाठी कर्नाटक भवन बांधणार असाल तर आम्हालासुद्धा बेळगावात महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी जागा द्या, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी नाशिक दौर्‍यादरम्यान माध्यमांशी संवाद साधत कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्यावर आगपाखड केली. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्राचे प्रत्येक राज्याशी प्रेमाचे संबंध असून कर्नाटकाशीसुद्धा आहेत. ज्याप्रमाणे मुख्यमंत्री काल परवा नवस फेडायला गेले होते, गुवाहाटीवरून येताना आसाममध्ये आसाम भवन उभे करण्याचे ठरवले, तर दुसरीकडे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर, कोल्हापूरमध्ये कर्नाटक भवन उभे करणार असल्याचे सांगितले.

मुंबईमध्येसुद्धा अनेक भवन आहेत. कानडी बांधवांचे अनेक हॉल्स, भवन आहेत, पण जर तुम्ही सीमावादाच्या लढ्यात काही गावांवर हक्क सांगताय म्हणून सोलापुरात किंवा कोल्हापुरात त्यासाठी कर्नाटक भवन बांधणार असाल तर आम्हालासुद्धा बेळगावात महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी जागा द्या. बेळगाव आणि बंगळुरूला महाराष्ट्र भवन बांधण्याची आमची इच्छा असून या ठिकाणी दोन भवन बांधण्यात येतील. त्यासंदर्भात निर्णय व्हावा, मग आम्ही तुमचा विचार करू, असे संजय राऊत यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना सुनावले.

लव्ह जिहादप्रकरणी राऊतांचे वादग्रस्त विधान
श्रद्धा वालकर हत्याकांडाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुळात आफताब आणि श्रद्धाचा जो विषय आहे तो अत्यंत निर्घृण आहे. अनेक मुलींच्या हत्या हिंदू मुलांकडूनही झाल्या आहेत. धमक्या देण्यात आल्या आहेत. या विषयावर सर्वांना एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल. ही प्रकरणे लव्ह जिहादची आहेत की वेगळे काही हे तपासावे लागेल, असे ते म्हणाले, परंतु राऊत यांच्या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाजपकडून टीका करण्यात आली आहे. भाजपने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याबाबत पोस्ट केली आहे. त्यात आफताबच्या सन्मानासाठी उद्धव ठाकरेंचा गट मैदानात उतरला, असा मजकूर नमूद आहे.