घरताज्या घडामोडीव्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या

व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या

Subscribe

भाजपा व्यापारी आघाडी तर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

कोरोना संकटामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बाजारपेठा बंद असून व्यापार्‍यांचे मोठे नूकसान झाले आहे. त्यामुळे १ जूनपासून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी यासह व्यापार्‍यांना कर काफी, व्याजदरात सवलत द्यावी आदी मागण्यांचे निवेदन भाजप व्यापारी आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना देण्यात आले.

लॉकडाऊनमुळे व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. व्यापार बंद असल्याने यावर आधारित कर्मचार्‍यांचाही उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन महिन्यापासून व्यापार बंद असल्याने व्यापार्‍यांवरील सामाजिक व आर्थिक ताण वाढत चालला आहे. व्यापारी हे देशाच्या पुरवठा साखळीचे मोठे भागीदार आहेत. शासनाने एकीकडे कारखाने सुरु करण्यास परवानगी दिली आणि दुसरीकडे दुकाने बंद करायला लावली. जर दुकाने बंद राहिली तर कारखान्यात तयार होणारा उत्पादन घेणार कोण ? सरकारने अडचणीत आलेल्या इतर क्षेत्रांना आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे. मात्र व्यापारी वर्गाचा कोणताच विचार केला नाही. तरी शासनाने दिलेल्या कोरोनाचे नियम पाळून व्यापार्‍यांना सकाळी 9 ते 5 या वेळेत व्यवसाय सुरू करण्यास मुभा देण्यात यावी.अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे, मयुर सराफ, सुनिल वाघ, शशिकांत शेट्टी, सुरज राठी, रघुवेंद्र जोशी, प्रतिक नांदुर्डीकर, गौतम हिरण आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री, पालकमंत्री यांनाही हे निवेदन पाठविण्यात आले.

- Advertisement -

या आहेत मागण्या
विज बिल माफ करणे
घरपट्टी माफ करण्यात यावी.
व्यवसाय कर माफ करण्यात यावे,
व्यापार्‍यांना कोरोना पॉलिसी दयावी.
मनपा व सरकारी गाळे धारक व्यापार्‍यांना दुकान भाडे माफ करण्यात यावे.
कर्जावरील इ.एम.आय. विना व्याज लावता व्यापार्‍यांना त्यात सवलत देण्यात यावी.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -