घरताज्या घडामोडीगुजरातसोबतच महाराष्ट्राच्या मध्यावधी निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

गुजरातसोबतच महाराष्ट्राच्या मध्यावधी निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

Subscribe

मध्यावधी निवडणुकांबाबत शरद पवारांनी जे वक्तव्य केलं आहे, त्याला मी समर्थन देतो, असंही राऊत म्हणाले आहेत.

राज्यातील सरकार हे तात्पुरते सरकार आहे. ही तात्पुरती व्यवस्था आहे. त्यामुळे गुजरातसोबत महाराष्ट्राच्या निवडणुका लागू शकतात, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलंय. आज ते दिल्लीत असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच, मध्यावधी निवडणुकांबाबत शरद पवारांनी जे वक्तव्य केलं आहे, त्याला मी समर्थन देतो, असंही राऊत म्हणाले आहेत. (Along with Gujarat, mid-term elections will be held in Maharashtra, claims Sanjay Raut)

हेही वाचा शिंदे सरकारची आज बहुमत चाचणी; आमदारांच्या अपात्रतेवरून संघर्षाची शक्यता

- Advertisement -

राज्यातील सरकार अस्थिर करून भाजपने शिवसेना फोडली. शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांसोबत भाजपने सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच, शिवसेना खासदार संजय राऊत रोज माध्यमांशी संवाद साधून भाजपला आव्हान देत आहेत. आजही त्यांनी भाजपला निशाण्यावर घेऊन मध्यावधी निवडणुकांबाबत संकेत दिले आहेत.

भाजप आणि शिंदे गटाने स्थापन केलेली सत्ता ही तात्पुरती व्यवस्था आहे. ही कायमस्वरुपी चालणारी व्यवस्था नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती, ती त्यांनी फोडून दाखवली आणि फुटीरवाद्यांसोबत त्यांनी सत्ता स्थापन केली, असंही संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ईडीचे समन्स, 5 जुलैला चौकशी

ते पुढे म्हणाले की, २०१९ मध्ये त्यांनी व्यवस्था केली असती तर महाविकास आघाडी स्थापनच झाली नसती. भाजपला मुख्यमंत्री पद मिळालं असतं. पण त्यांच्या या व्यवस्थेमुळे त्यांना तेव्हाही मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, आणि आताही नाही. तेव्हा त्यांनी शिवसेनेला डावललं आणि फोडण्याचा प्रयत्न केला. शिवेसनेला फोडणं, तोडणं, तडीस नेणं हेच भाजपचा उद्देश असल्याचंही त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत

केंद्राला महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत. या तीन तुकड्यांमध्ये मुंबईचा एक तुकडा आहे. मुंबईच्या धनसत्तेवर काहींना ताबा हवा आहे. त्यासाठी शिवसेनेला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामुळे शिवसेना कागदावर कमजोर झाली. पण प्रत्यक्षात शिवसेना कमजोर झाली नाही. शिवसैनिक आजही रस्त्यावर उतरून लढा देतील, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -