अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर आता विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. सत्ताधाऱ्यांना घरी बसवा, असं विद्यार्थी म्हणत आहेत. अजित पवार यांनी म्हटलं होतं की, शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणारा खर्च प्रचंड असून एका कर्मचाऱ्याच्या पगारात खासगी कंपनीचे तीन- तीन कर्मचारी काम करू शकतात. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता सरकारी परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांमध्ये नाराजी आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांसह, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घरी बसवावं, असं म्हटलं आहे. त्यातच राज्य सरकारने अनेक विभागांत कंत्राटी पद्धतीनं भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे. (Along with the Eknath Shinde Chief Minister make both the Deputy Chief Ministers Devendra Fadnavis and Ajit pawar statement angered students )
विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप
अजित पवार यांच्या वक्तव्यावर राज्यभरातील विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. स्पर्धा समितीने पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करत शासकीय नोकर भरतीला विरोध करणाऱ्या राज्यातील सरकारला घरी बसवा, असं आव्हान ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे.
काय म्हणाले होते अजित पवार ?
उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरला जात असताना डेमोक्रेटिक पक्षाच्या शिष्टमंडळाने शासकीय नोकरभरती खासगी कंपनीऐवजी शासनामार्फत करण्याची मागणी करणारं निवदेन दिलं. यावेळी, चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित होते, यावेळी ते म्हणाले की शासकीय नोकरांचे पगार, भत्ते, महागाई वाढत आहे. यामुळे जर सर्वच ठिकाणी शासकीय कर्मचारी नियुक्त केले तर तुम्ही मुख्यमंत्री झालात तरी राज्याचा महसूल केवळ पगारावर खर्च होईल. मग रस्ते व अन्य कामासाठी निधी कुठला येणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
(हेही वाचा: Saral Seva Bharati 2023: शासकीय कंत्राटी भर्तीचा GR निघाला; सरकारी नोकरीचं स्वप्न भंगलं? )
पदांच्या भरतीसाठी 9 कंपन्यांना कंत्राटं
शासनाने आता सरळ सेवा भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधीचा जीआर सुद्धा काढण्यात आला आहे. त्यामुळे लाखो तरुण-तरुणींना याचा फटका बसणार आहे. सरकारच्या या निर्णयाने सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. तर दुसरीकडे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना आता रोजगार मिळणार आहे. यामुळे तब्बल 85 संवर्गातील शासकीय पदं ही कंत्राटी पद्धतीनं थेट भरली जाणार आहेत. तब्बल 138 संवर्गातील हजारो शासकीय पदं यापुढे थेट कंत्राटीपद्धतीनेच भरली जाणार असल्याची माहिती आहे. शिपाई ते इंजिनीअरची विविध पदं थेट कंत्राटी पद्धतीनेच भरली जाणार आहेत. यासाठी 9 खासगी कंपन्यांना सरळसेवा पदांच्या भरतीसाठी कंत्राटं दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.