घरअर्थजगतमहाराष्ट्रातील प्रकल्पांवर आधीपासून डोळा, 'हे' प्रकल्प गेले गुजरातमध्ये

महाराष्ट्रातील प्रकल्पांवर आधीपासून डोळा, ‘हे’ प्रकल्प गेले गुजरातमध्ये

Subscribe

मुंबई – वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील अनेक उद्योग, सरकारी कार्यलाये आणि प्रस्तावित प्रकल्प आयत्यावेळेला गुजरातला हलवण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यावरून तत्कालीन काळात विरोधकांनी केंद्र सरकावर तुफान टीकाही केली. मात्र, त्यानंतरही महाराष्ट्राला उभारी देणारे, रोजगार निर्माण करणारे प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्याने राजकीय नेत्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनी संताप व्यक्त केलाय. दरम्यान, गेल्या काही वर्षांत मुंबहून गुजरातला नक्की काय काय गेलंय यावर एक दृष्टीक्षेप टाकूयात.

हेही वाचा – स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्रासाठी धोके, उद्योगप्रकल्प गुजरातला गेल्यामुळे आदित्य ठाकरे संतापले

- Advertisement -

तळोजातील औद्योगिक वसाहत गुजरातला

तळोजा येथे मोठी औद्योगिक वसाहत आहे. २०१७ पर्यंत येथे साडेसहाशे लहानमोठे कारखाने होते. यामध्ये अनेक रासायनिक कारखाने आहेत. त्यामुळे या परिसरात प्रदूषणाची मोठी समस्या आहे. प्रदूषणामुळे तळोजा औद्योगिक वसाहतीतील वातावरण गढूळ असतं. त्यामुळे येथील अनेक कारखान्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावल्या जात जातात. त्याबरोबरच कारखाने बंद केले जात आहेत. या परिस्थितीमुळे अनेक कंपन्या गुजरातल्या वळवण्यात आल्या आहेत. २०१७ च्या आकेडवारीनुसार दीपक फर्टिलायझर, दीपक नायट्रेट, गॅलक्सी, केलॉग्ज, नूर फूड्स, व्हीव्हीएफ, उल्का सीफूड्स यासारख्या कंपन्यांनी नवीन विस्तार प्रकल्प गुजरातला हलवण्याचा निर्णय घेतला होता.

अरविंद सावंतांनी लोकसभेत उपस्थित केला प्रश्न

दरम्यान, मुंबईतील अनेक उद्योग गुजरातला नेण्याचे प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. यावरून २०१५ साली हा मुद्दा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत लोकसभेत उपस्थित केला होता. “मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. आतापर्यंत मुंबईची भरभराट होत होती, पण गेल्या काही काळात सरकारने काही निर्णय घेतले. आधीच्या UPA सरकारने एअर इंडियाचं मुख्यालय दिल्लीला हलवलं. नंतर आपल्या सरकारने पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्कचं ऑफिस दिल्लीला हलवलं. यानंतर नॅशनल मरीन पोलीस अकादमी पालघरहून गुजरातमधल्या द्वारकाला हलवण्यात आली. आता मुंबईच्या पोर्ट ट्रस्टमध्ये होत असलेलं ‘शिप रेकिंग’चं काम गुजरातमधल्या अलंगला नेण्यात येतंय. अशाप्रकारे मुंबईच ‘डिसमँटल’ करण्यात येत आहे,” असा दावा त्यावेळी अरविंद सावंत यांनी केला होता.

- Advertisement -

International Financial Services Center (IFSC) गुजरातला हलवले

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये अडकला होता तेव्हा मुंबईतील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र – International Financial Services Center (IFSC) गुजरातला हलवण्यात आले. २०२० मध्ये ही बातमी समोर येताच संपूर्ण राज्यात खळबळ माजली. मुंबई ही राज्याची आर्थिक राजधानी असताना आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरातला हलवण्यावरून महाविकास आघाडी सरकाने केंद्रावर टीकास्त्र सोडलं होतं. मात्र, तरीही हे केंद्र गुजरातला हलवण्यात आले. देशातून मुंबईचं महत्त्व कमी करण्याकरता हे केंद्र गुजरातला हलवण्यात आल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता.

हेही वाचा – कोरोनाच्या संकटात ‘यामुळे’ तापले राज्यातले राजकारण

आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र म्हणजे एक असे क्षेत्र जिथं निवासी आणि अनिवासी भारतीयांना परकीय चलन व्यवहार सेवा दिली जाते. IFSC अंतर्गत येणाऱ्या विविध सेवांवरच्या नियंत्रकाचं काम सध्या रिझर्व्ह बँक, सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) आणि इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI) करतात. हे केंद्र मुंबईतील बीकेसी येथे प्रस्तावित होते.

हेही वाचा – IFSC मुंबईतून हलवण्याला पवारांचा विरोध, मोदींना लिहिले पत्र

मात्र, हा प्रकल्प गुजरातला वळवण्यात आला. गुजरात येथील गांधीनगर मधल्या Gujarat International Finance Tech City म्हणजेच GIFT सिटीला हा प्रकल्प हलवला गेला आहे. गिफ्ट सिटी हा नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो. टॅक्स हेवन म्हणून ओळखले जाणारे देश वा परदेशात जाणाऱ्या उद्योगांना आकर्षित करून भारतात आणण्याचं या प्रकल्पाचं उद्दिष्टं होतं.

एकंदरीत आतापर्यंत अनेक प्रकल्प गुजरातला हलवण्यात आले. यामागची विविध कारणं देण्यात आली. पण आर्थिक राजधानी असलेल्या या मुंबईला साईडलाईनला करण्याकरता आणि मुंबईचं महत्त्व कमी करण्याकरता प्रकल्प गुजरातला हलवण्यता येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -