घरमहाराष्ट्रचित्रपटाला आवाज देणारे तरी..., वंशजांचा दाखल देत आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला

चित्रपटाला आवाज देणारे तरी…, वंशजांचा दाखल देत आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला

Subscribe

काल पत्रकार परिषद घेत रुपाली देशपांडे यांनी चित्रपटावर आक्षेप घेतला. हाच दाखला घेत राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

मुंबई – हर हर महादेव या ऐतिहासिक चित्रपटामुळे राज्यात गदारोळ सुरू आहेत. या चित्रपटात दाखवण्यात आलेले अनेक प्रसंग इतिहासाला धरून नाहीत, असा खुलासा बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी केला आहे. काल पत्रकार परिषद घेत रुपाली देशपांडे यांनी चित्रपटावर आक्षेप घेतला. हाच दाखला घेत राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड ट्विटमध्ये म्हणतात की, “हर हर महादेव या चित्रपटावर अखेरीस हा कुठल्याही ऐतिहासिक संदर्भाला धरुन चित्रपट नाही असे बाजीप्रभू देशपांडे यांच्या सर्व वंशजांनी एकत्रित येऊन पत्रकार परिषदेत जाहीर केले.”

- Advertisement -

हेही वाचा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम २०२४पर्यंत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

“आता तरी त्याचे समर्थन करणाऱ्यांचे डोळे उघडतील का? किंवा ज्यांनी त्या चित्रपटाला आवाज दिला आहे ते तरी मागणी करतील का, की हा चित्रपट दाखवू नका आणि इतर भाषेमध्ये देखील हाच चित्रपट दाखवणार आहेत. तो ही रद्द करतील का?” असा थेट सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केला आहे.

- Advertisement -


बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज रुपाली देशपांडे यांनी काल पत्रकार परिषद घेत सिनेमातील अनेक प्रसंगावर आक्षेप घेतले. बाजीप्रभू देशपांडे हे भोर जवळच्या सुभेदार वाडी शिंदे या गावचे रहिवासी होते. पुण्यापासून ते ६० किमी अंतरावर राहत होते. त्यांचं मूळ आडनाव प्रधान होते. क्षत्रियांना शोभेल असा पराक्रम बाजीप्रभू देशपांडे यांनी केला आहे. आम्ही चित्रपट पाहिल्यानंतर आमचा आक्षेप नोंदवत आहोत, असं रुपाली देशपांडे म्हणाले.


हेही वाचा – पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांना विरोध, मनसेचा चित्रपट निर्मात्यांना इशारा

रुपाली देशपांडे यांनी काय आक्षेप नोंदवले?

  • बाजीप्रभू देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. ही बाब खटकणारी आहे.
  • हिरडस मावळ येथे समुद्र किनारा दाखवला आहे. प्रत्यक्षात तिथे शिरवळला नीरा नदी आहे. महाराष्ट्रीयन मुलींना इंग्रज घेऊन जात आहेत, असं दाखवलंय. त्या काळात खरच मावळमध्ये इंग्रजांचं प्राबल्य इतकं होतं का? हा खूप मोठा प्रश्न आहे. आम्हीही इतिहासतज्ज्ञांशी चर्चा केली. त्यांचंही हेच मत आहे.
  • बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे हे सख्खे भाऊ. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली या दोन्ही भावांमध्ये वाद दाखवण्यात आला आहे. फुलाजी प्रभूंनी विश्वासघात केल्याचं म्हटलंय. यामुळे फुलाजी प्रभू देशपांडे यांची प्रतिमा डागाळली गेली आहे. हे दोघेही बंधू स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले.
  • चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टी असावी. काल्पनिक कथेत ती असते. पण ऐतिहासिक गोष्टी बदलण्याचा अधिकार कुणालाही नाही. ऐतिहासिक घटनांचा क्रम बदलणे चुकीचं आहे. त्यामुळे अनेक चित्रपट काढणाऱ्यांनाही संभ्रम होऊ शकतो.
  • अफजलखानाचा वध झाला तेव्हा बाजीप्रभू देशपांडे हजर नव्हते. पण चित्रपटात तिथे बाजू प्रभू देशपांडे दाखवण्यात आले आहेत. हे इतिहासाला धरून आहे का?
  • शिवा काशिदचा पराक्रमही नाकारल्यासारखा केलाय.
  • बाजीप्रभू हे बांदल देशमुख यांचे सरनौबत होते. पण त्यांच्यात वेगळ्याच पद्धतीची भांडणे दाखवण्यात आली. त्यांच्यात वेगळ्याच कारणाने वाद होते.
  • अफजलखानाला बकरी दाखवून आणायचं तसं आणलं.. तशी बाजीप्रभू देशपांडेंनी देवळं बांधली, असं दाखवलं.. हे इतकं सोपं नाही.
  • चित्रपट प्रदर्शनापूर्वी ऐतिहासिक माहिती असलेले इतिहास सल्लागारांची गरज असते. वंशजांनाही दाखवण्याची विनंती मी केली होती. पण कुणीही आमच्याशी संपर्क केला नाही.
Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -