घरट्रेंडिंगAmazon Mango Fiesta: 'अॅमेझॉन फ्रेश'चा मँगो महोत्सव; 2-3 तासांत मिळणार घरपोच डिलिव्हरी

Amazon Mango Fiesta: ‘अॅमेझॉन फ्रेश’चा मँगो महोत्सव; 2-3 तासांत मिळणार घरपोच डिलिव्हरी

Subscribe

अॅमेझॉन फ्रेशने आपल्या ग्राहकांसाठी एक ऑफर आणली आहे. अॅमेझॉन फ्रेशने मँगो फिएस्टाची घोषणा केली आहे. हा महोत्सव सुरु झाला आहे आणि मे २०२२ च्या अखेरपर्यंत सुरू असेल.

उन्हाळा सुरू झाला की, सर्वांना कोकणातल्या हापूस आंब्याची चाहूल लागते. हापूस आंबा म्हणजे सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय कारण त्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागते. हापूस आंबा खाण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागते. तसंच उत्तम आंबा विकत घेण्यासाठी बऱ्याच बाजारपेठांना पालत घालावं लागतं. मात्र आता या आंब्याची ऑनलाईन खरेदी केली जात आहे. त्यानुसार अ‍ॅमेझॉन या ऑनलाईन साईटवर हापूस आंब्याची विक्री होत आहे. अशातच आता अॅमेझॉन फ्रेशने आपल्या ग्राहकांसाठी एक ऑफर आणली आहे. अॅमेझॉन फ्रेशने मँगो फिएस्टाची घोषणा केली आहे. हा महोत्सव सुरु झाला आहे आणि मे २०२२ च्या अखेरपर्यंत सुरू असेल.

या मँगो फिएस्टामध्ये ग्राहक कार्बाइड मुक्त, सुरक्षितपणे पिकवलेले आणि उच्च दर्जाचे ताजे आंबे निवडू शकतात ज्यामधे सफेदा, बंगनपल्ली, बदामी, सिंधुरा, थोतापुरी, अल्फान्सो आणि इतरांचा समावेश आहेत. अॅमेझॉन फ्रेश बंगळुरूमधील ग्राहकांसाठी कर्नाटक अल्फान्सो, कलापड व रासपुरी आणि कोलकातामधील ग्राहकांसाठी गुलाबखास व पर्कल्मन सारख्या प्रादेशिक आवडीच्या जातीचे आंबे ऑफर करत आहे.

- Advertisement -

ग्राहक अस्सल आंब्याचा आनंद जसे रत्नागिरी अल्फान्सो, देवघड अल्फान्सो, ऑरगॅनिक अल्फान्सो आणि प्रीमियम केसरयुक्त आंबे थेट रत्नागिरीमध्ये अॅमेझॉन कलेक्शन सेंटरमधून घेऊ शकतात. ग्राहकांना आंब्यांच्या खरेदीवेळी बँक ऑफर, कॅशबॅक आणि रिवॉर्ड्सवर 10 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सूट देखील मिळवता येणार आहे.

बंगळुरू, दिल्ली, फरिदाबाद, गुडगाव, गाझियाबाद, नोएडा, अहमदाबाद, म्हैसूर, जयपूर, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, पुणे, कोलकाता आणि चंदीगड सह टॉप 15 पेक्षा जास्त शहरांमधील ग्राहकांना सकाळी 6 ते मध्यरात्रीपर्यंत दोन ते तीन तासांच्या डिलिव्हरी स्लॉटमध्ये उच्च-दर्जाच्या ताज्या आंब्याचा आनंद घेता येईल.

- Advertisement -

हापूस आंब्याची ऑनलाईन खरेदी

हापूस आंब्याच्या ऑनलाईन खरेदी-विक्रीसाठी अ‍ॅमेझॉन कंपनीनं पुढाकार आहे. कंपनीनं मिरजोळे एमआयडीसीमध्ये आंबा संकलन केंद्र सुरू केले आहे. ही कंपनी रत्नागिरी हापूस आंबा विकणार असून थेट बागायतदारांकडून आंबा खरेदीला अ‍ॅमेझॉनने सुरुवातही केली आहे. यंदा उत्पादनात घट झाल्यानं हापूस आंबा मिळणं दुरापस्त झालं होतं. पण आता अ‍ॅमेझॉन यामध्ये उतरले असल्याने मुख्य शहरांमध्ये ग्राहकांपर्यंत हापूस आंबा पोहचवला जाणार आहे. यामुळं उत्पादकांना योग्य दर आणि ग्राहकांना खात्रीशीर भौगेलिक मानांकन मिळालेलाच आंबा मिळणार आहे.

शेतकऱ्यांचा हापूस आंबा अ‍ॅमेझॉन कंपनीला मिळावा याकरिता रत्नागिरी येथील मिरजोळे एमआयडीसीमध्ये आंबा संकलन केंद्र उभारण्यात आले आहे. हापूसला चांगला दर मिळवून देण्यासोबतच बागायतदारांना गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठी खते, औषधे व इतर साहित्य अ‍ॅमेझॉनकडून उपलब्ध करून देण्यासाठी अ‍ॅप विकसित केले जाणार असल्याचं समजतं.

सध्या ऑनलाईनचा जमाना असून सर्वच व्यवहार हे ऑनलाईन चालतात. बदलत्या काळानुसार बदल केला नाही तर व्यवसायाच्या स्पर्धेत आणि नवयुगात टिकून राहता येत नाही. त्यामुळं हल्ली नागरिकांना सोयीस्कर म्हणून सर्वच व्यवहार हे ऑनलाईन चालत आहेत. त्यानुसार, विविध वस्तूंचे ऑनलाईनच्या माध्यमातून मार्केटींग आणि विक्री केली जात होती. अ‍ॅमेझॉन कंपनीचे प्रतिनीधी हे शेतकऱ्यांच्या आंब्याची जागेवर खरेदी करणार आहेत. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना त्याचा मोबदलाही दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूकीचा प्रश्न मिटणार आहे. शिवाय प्रत्येक आंब्याच्या पेटीवर भौगोलिक मानांकन असल्याचे प्रमाणपत्र लावावे लागणार आहे.


हेही वाचा – काय सांगतास? कोकणचो हापूस आता मिळतलो Amazon वर, एक डझन आब्यांची किंमत…

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -