ठाकरेंचं शिंदे-फडणवीस सरकारपेक्षा एक पाऊल पुढे, दानवे आणि आदित्य ठाकरे उद्या नाशिक दौऱ्यावर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानाची पाहणी केली. त्यानंतर आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे उद्या तातडीनं नाशिक आणि पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करणार आहेत. या दौऱ्यात अतिवृष्टीमुळे बाधित आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची व भागाची पाहणी करुन ते शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शेतीच्या नुकसानाची पाहणी करणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. नंदूरबारपासून दौरा सुरू होणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकत दौऱ्याला सुरूवात केली.

कसा असेल नेत्यांचा नाशिक-पुणे जिल्हा दौरा

गुरुवार दि. २७ ऑक्टोबर २०२२

दु. १२.०० वा. : अतिवृष्टीमुळे झालेली पिक नुकसान पाहणी स्थळ : सोनारी, ता.सिन्नर जि.नाशिक.

दु. ०२.०० वा. : आत्महत्याग्रस्त शेतकरी दरशथ लक्ष्मण केदार यांच्या निवासस्थानी कुटूंबीयांची सांत्वनपर भेट वडगांव, आळेफाटा ता.जुन्नर जि. पुणे.

दु.०३.१५ वा. : अतिवृष्टीमुळे झालेली पीक नुकसान पाहणी स्थळ : वाबळे, ता. शिरूर जि. पुणे.

दु. ०४.०० वा. : अतिवृष्टीमुळे झालेली पीक नुकसान पाहणी स्थळ : वरूडे, ता. शिरूर जि. पुणे.

दु. ०४.३० वा. : झालेली पीक नुकसान पाहणी स्थळ : मलठण, ता. शिरूर जि. पुणे.

दरम्यान, आदित्य ठाकरे हे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधतील. त्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत. ते शेतकऱ्यांसोबत काय संवाद साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : भारतीय माणूस काहीही करू शकतो.., ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांच्याबाबत शरद पवारांची प्रतिक्रिया