Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Politics : मनसेला सोबत घेण्यासंदर्भात आमच्या पक्षात...; काय म्हणाले अंबादास दानवे?

Maharashtra Politics : मनसेला सोबत घेण्यासंदर्भात आमच्या पक्षात…; काय म्हणाले अंबादास दानवे?

Subscribe

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेला मानणारा वर्ग मराठी आहे. याचपार्श्वभूमीवर भविष्यात महाराष्ट्र वाचवण्यासाठी आम्हाला गंभीर्याने पावलं टाकावी लागतील, असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. यानंतर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मराठी माणसासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेला मानणारा वर्ग मराठी आहे. याचपार्श्वभूमीवर भविष्यात महाराष्ट्र वाचवण्यासाठी आम्हाला गंभीर्याने पावलं टाकावी लागतील, असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. यानंतर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. (Ambadas Danve clarifies his stance on alliance talks with MNS)

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे बंधुंनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी एकत्र यावे, अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात होताना दिसत आहे. यासंदर्भात अंबादास दानवे यांना विचारणा आले. यावर म्हणाले की, मनसेला सोबत घेण्यासंदर्भात आमच्या पक्षात शून्य टक्के चर्चा आहे. मनसे किंवा आम्ही त्यांना साद घालू, असं मला वाटत नाही होऊ शकते. कारण विधानसभा निवडणुकीत मनसे कोणासोबत होती हे त्यांनी आधी स्पष्ट करावं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच मनसे म्हणत होते भाजपाचा मुख्यमंत्री होईल आणि त्यांनी भाजपाच्या विरोधात उमेदवार दिले होते, असे म्हणत अंबादास दानवे यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावली.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : मुंबई महानगर पालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार का? राऊत म्हणतात…

दानवेंकडून पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा?

दरम्यान, अंबादास दानवे म्हणाले की, आम्ही आता महाविकास आघाडीसोबत आहोत. अद्याप कुठलाही वेगळा निर्णय झालेला नाही. कारण आमचे मतं महाविकास आघाडीमध्ये राहून कमी झाले नाही. काही ना काही तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा फायदा शिवसेनेला झाला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचा फायदासुद्धा त्यांना झाला आहे. परंतु अनेक जागा काँग्रेसने लोकसभा निकाल आणि सर्व्हेचा दाखला देत आम्हाला दिल्या नाहीत. स्वतः कडे ठेवल्या आणि तिथे काँग्रेस उमेदवार पडले. असे असले तरी शिवसेनेची मतं कमी झाली नाहीत तर उलट मुस्लिम मतांचे प्रमाण वाढले आहे. आमचा मुस्लिम आमदार निवडून आला. त्यामुळे शिवसैनिकांची जी भावना होती ती मी मांडली आहे. याआधी महापालिका निवडणूक आम्ही स्वबळावर लढली होती आणि भाजपापेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या, याकडेही अंबादास दानवेंनी यावेळी लक्ष वेधले. त्यामुळे ठाकरे गट मुंबई महानगर पालिका निवडणूक स्वबळावर लढणार का? असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : मनसेला सोबत घेण्यासंदर्भात आमच्या पक्षात…; काय म्हणाले अंबादास दानवे?


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -