घरमहाराष्ट्रभाजपची ढाल आणि गद्दारीची तलवार...; शिंदे गटाच्या चिन्हावर दानवेंची टीका

भाजपची ढाल आणि गद्दारीची तलवार…; शिंदे गटाच्या चिन्हावर दानवेंची टीका

Subscribe

अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुक आयोगाने शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिल्यानंतर आज ढाल तलवार हे चिन्ह दिलं आहे. यावरून उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार टीकास्त्र डागले जात आहे. यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही शिंदे गटावर जहरी टीका केली आहे. अंबादास दानवे यांनी ढाल भाजपची असून गद्दारीची तलवार म्हणत शिंदे गटावर निशाणा साधला आहे. अंबादास दानवे यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे.

अंबादास दानवे यांचे ट्विट

अंबादास दानवे यांनी ट्विट करत म्हटले की, भाजपची ढाल आणि गद्दारीची तलवार… व्वा रे जोडी! #मिंधेगट.

- Advertisement -

दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर सोमावारी दोन्ही गटाला नवं नाव दिलं. यात उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले, मात्र शिंदे गटाने दिलेली चिन्ह अमान्य करत त्यांना नव्याने तीन चिन्ह देण्याचे निर्देश दिले होते. ज्यानंतर शिंदे गटाने तळपता सूर्य, ढाल तलवार, पिंपळाचं झाड ही चिन्ह निवडणूक आयोगाकडे पाठवली. ज्यातील ढाल तलवार हे चिन्ह शिंदे गटाला देण्यात आले. या चिन्हावरून आता ठाकरे गटाकडून शिंदे गटावर प्रहार केला जात आहे. आता शिंदे गटालाही चिन्ह मिळाल्यानंतर अंधेरी निवडणुकीत मशाल विरुद्ध ढाल तलवार असा सामना रंगणार आहे.

- Advertisement -

दरम्यान शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनीही शिंदे गटावर निशाणा साधला आहे. अंधारे म्हणाल्या की, एका म्यानात एकच तलवार बसते. त्यांच्या चिन्हात दोन तलवारी आहेत. त्यामुळे आता भाजप देवेंद्र आणि शिंदेंच्या तलवारीपैकी कुणाची तलवार वापरणार? भाजपच्या म्यानात देवेंद्र फडणवीस यांच्याच तलवारीला मान असेल मग एकनाथ शिंदेंच्या तलवारीचे काय होईल? असा प्रश्न आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्याचे म्हणत त्यांनी जी ढाल घेतली, गद्दारी आणि केलेला विश्वासघात लपवण्यासाठी त्यांनी आता ढाल वापरायचे ठरवले असेल. पण तलवारीमुळे खरा प्रश्न निर्माण झाला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या तलवारीला सन्मान मिळेल पण एकनाथ शिंदेंची तलवार कुठे ठेवायची म्हणत अंधारेंनी शिंदे गटावर टीकास्त्र डागले आहे.


प्रक्षोभक भाषण केल्याने विनायक राऊत, सुषमा अंधारे आणि भास्कर जाधवांविरोधात गुन्हा दाखल

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -