घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांची पाच ते सातवेळा दिल्लीवारी, पण... अंबादास दानवेंची टीका

मुख्यमंत्र्यांची पाच ते सातवेळा दिल्लीवारी, पण… अंबादास दानवेंची टीका

Subscribe

मुंबई – आज विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 260 नुसार प्रस्ताव मांडला. यावेळी विरोधी पक्षांनी पूर, शेतकरी आत्महत्या आणि अतिवृष्टी विषयी भाष्य केले. यावेळी मुख्यमंत्री पाच ते सात वेळा दिल्लीवारी करतात पण शेतकऱ्याच्या मदतीची मागणी करत नाहीत, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. तर शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्याचे कृषि दिनी मुख्यमंत्री म्हणाले होते पण 45 दिवसात 137 आत्महत्या झाल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली.

शेतकऱ्यांचे प्रंचड नुकसान झाले आहे. या नुकसानीकडे सरकार उघड्या डोळ्यांनी बघत आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्रात  प्रंचड अतिवृष्टी झाली. यानंतर सराकरने फक्त दोन ओळीची घोषणा केली. यात शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या नियमा नुसार हेक्टरी 13600 मदत दिली जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, एनडीआरएफचे नियम 2015 ते 2020 या कालावधीसाठी झाले आहेत. या नियमांबाबत विचार होणे गरजेचे आहे. एडीआरफच्या नियमातील हे निकष हास्यास्पद असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादा दानवे यांनी सांगीतले. यावेळी यावेळी पुरवणी मागण्यामध्ये शेतकऱ्यांच्या मदतीचा उल्लेख कोठेही नसल्याचे विरोधी पक्षनेते म्हणाले. यामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत त्यांनी देण्याची मागणी केली.

- Advertisement -

मुख्यंत्र्यांवर टीका – 

यावेळी राज्यात पूर स्थितीअसताना मुख्यमंत्री पाच ते सहावेळा दिल्ली दौरा करतात पण केंद्राचे पथक यावे यासाठी प्रयत्न केल्याचे आयकीवात नाही. अतीवृष्टीसाठी मदतीची मागणी केल्याचे आयकीवात नाही, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. तर यावेळी कृषी दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करणार असल्याचे म्हणाले होते. पण मागच्या 45 दिवसात 137 शेतकरी आत्महत्या झाल्या, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

- Advertisement -

अब्दुल सत्तारांच्या सुतगीरणीला नियम डावलुन पैसे दिल्याचा आरोप- 

शेतकऱ्याला मदतीची आवश्यकता असताना हे सरकार सीलोड मधील एका सुतगीरणीला मदत देत आहे. याबाबत अब्दुल सत्तरा यांनी सुत गिरणीला 15 कोटींची मदत दिली आहे. ही सुतगीरणी शासनाच्या नियमात बसत नसताना तीला मदत करण्यात आली आहे, अशी टीका अंबादस दानवे यांनी केली.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -