घरताज्या घडामोडीमहाजनको कोलगेट घोटाळ्याची चौकशी करावी, अंबादास दानवेंची मागणी

महाजनको कोलगेट घोटाळ्याची चौकशी करावी, अंबादास दानवेंची मागणी

Subscribe

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत महाजनको कोलगेट घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी केली. तसेच शिंदे गटातील मंत्र्यांनी केलेल्या घोटाळ्यावरूनही अंबादास दानवेंनी त्यांच्यावर ताशेरे ओढले.

माझ्याकडे आणखी एक पत्र आलं आहे. महाजनको कोलगेट घोटाळा आरटीआयच्या माध्यमातून उघडकीस आला आहे. वॉशिक कोल वॉश करार २२ लक्ष मेट्रीक टनाचा आणि रिजेक्ट कोल ५५ लाख आहे. बाजारातील किंमत ५ हजार ५०० कोटी आहे. परंतु विक्री किंमत २२० कोटी आहे. ५५०० कोटींचा कोळसा २२० कोटीला विकला जातो, त्यामुळे मला वाटतं हा महाजनको कोलगेट घोटाळा समोर येण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात चौकशी करण्याची आवश्यकता आहे, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.

- Advertisement -

कोळसा कमी किंमतीत विकून शासनाचा महसूल बुडवला. आपण राज्य आर्थिकदृष्टया मजबूत व्हावं असं आपण म्हणतो. आपल्याला ५२ हजार कोटी रुपयांचा पुरवणीअर्थ संकल्पपट ठेवावा लागतो. यावर्षात हिवाळी अधिवेशनात ५२ हजार कोटींच्या आपण पुरवण्या मांडल्या आहे, असं असताना महसूल सरकारचा कमी होत असेल तर यावर सरकार काय म्हणणार?, यांना स्वच्छ सरकार असं म्हणता येईल का?, असं सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.

हे सरकार स्वच्छ भावनेने याकडे बघतंय का?, स्वत:च्या मंत्र्यांना अशा पद्धतीने क्लिनचीट देणं आणि भ्रष्टाचाराला झाकणं हा खूप मोठा अपराध आहे. त्यामुळे सरकारला माझी विनंती आहे की, अतिवृष्टीसाठीची मदत जाहीर केली पाहीजे. मागील काळात उद्योग विभागाने जे भूखंड थांबवले. जे उद्योग महाराष्ट्रातून गेले. त्यामुळे आणखी काही उद्योग महाराष्ट्रात यावे, यासाठी आपण प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. अशा पद्धतीने भ्रष्टाचार होत असेल तर या भ्रष्टाचाराला थांबवण्यासाठी सरकारने सुद्दा तीव्र भूमिका घेण्याची आवश्यकता आहे, असं दानवे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा :  उपमुख्यमंत्री बोलताना बाकडे, टाळ्या वाजवतात आणि मुख्यमंत्री..; अजितदादा आणि फडणवीसांमध्ये जुंपली


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -