मुख्यमंत्र्यांना बडव्यांनी घेरले, तर संजय शिरसाठ यांना कुणी घेरले… – अंबादास दानवे

Ambadas Danve

शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बडव्यानी घेलल्याचा आरोप केला. यावर आमदार आणि औरंगाबाद जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. स्वत: शिरसाठ आठवड्यातून दोन दिवस मतादसंघात असतात ते जनतेला भेट नाहीत. त्यांना उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारायचा अधिकार आहे का ? असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यानंतर शिवसैनिकांना संजय शिरसाठ यांना कुणी घेरले आहे? असा सवाल केला. यावर शिवसैनिकांनी शिरसाठ त्यांना डान्सबारने घेरल्याचा आरोप केला. ते औरंगाबादमध्ये शिवसेना मेळाव्यात शिवसैनिकांशी बोलत होते.

आमदार संजय शिरसाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटत नाहीत अशी तक्रार करतात. मात्र, ते स्वत: मतदारसंघात किती दिवस असतात? ते आठवड्यातून दोन दिवस मतदार संघात असातात. हे स्वत: मतदारसंघात दोन दिवस असतील आणि मतदारांना भेटत नसतील तर यांना उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारायचा अधिकार आहे का? ते दोन दिवस मतदारसंघात असतात हे सत्य आहे. मात्र ,उद्धव ठाकरे भेटत नाहीत हे असत्य आहे, असे अंबादास दानवे म्हणाले.

शिरसाठ 3 महिन्यात 4 वेळा वर्षावर –

मागच्या २-३ महिन्यात चारवेळा संजय शिरसाठ वर्षावर गेले. पाणी पुरवठा बैठक, अधिवेशनाच्या आधी गेले, महिनाभरापूर्वी स्नेहभोजन ठेवले त्याला गेले. तुम्ही स्वतः जनतेला भेटत नाही. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २ महिन्यात चारवेळा भेटतात. तरी प्रसारमाध्यमांमध्ये उद्धव ठाकरे भेटत नाहीत असा आरोप करतात,  असे अंबादास दानवे म्हणाले.

बडव्यानी घेरले तर त्यांच्या घरी चार चार वेळा भेटायला का जाता –

संजय शिरसाठ पत्रात म्हणतात उद्धव ठाकरे यांना बडव्यांनी घेरले, मग संजय शिरसाठांना कोणी घेरले आहे? उद्धव ठाकरे यांना बडव्यांनी घेरले आहे, तर हे बडवे तुम्हाला गोड कसे लागतात? तुम्ही त्यांना घरी जेवायला का बोलावतात. त्यांच्या घरी चार चार वेळा भेटायला का जाता. याचा अर्थ तुम्हाला बडवेच आवडतात. याचा अर्थ एका चांगल्या मुख्यमंत्र्याला औरंगाबाद पश्चिमच्या आमदाराने बदनाम केले. याचा सर्वांनी निषेध केला पाहिजे, असेही दानवे म्हणाले