घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरशेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेचा मशाल मोर्चा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेचा मशाल मोर्चा

Subscribe

परभणी – परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न व मागण्यांसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर हाती मशाल घेऊन धडक मोर्चा काढण्यात आला. ओला दुष्काळ जाहीर करा, पिकविम्याचा परतावा शेतकऱ्यांना मिळावा व शेतीसाठी २४ तास वीज पुरवठा उपलब्ध व्हावा या प्रमुख मगाण्यांसाठी या धडक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले.

जायकवाडी, येलदरी, दुधना, सिद्धेश्वर या धरणाचे पाणी शेतीसाठी सोडावे, लोडशेडींग बंद करून शेतकऱ्यांसाठी २४ तास वीज उपलब्ध करून द्यावी, शेतमजूर आणि बेरोजगार तरुणांच्या हाताला काम द्यावे. याबाबत आज परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास शिवसेनेच्या वतीने परभणीसह राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दानवे यांनी दिला.

- Advertisement -

परभणी जिल्ह्यात सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरिपाची पिके जोमात आली मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने उर्वरित पिकेही खराब झालीत. यामुळे दुबार पेरणी करूनही नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असतानाही शासनाने अद्याप जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही. तसेच शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोबदला देखील दिला नाही. अनेक शेतकऱ्यांना तर मागील वर्षाचे अनुदानही मिळालेले नाही.

जिल्ह्यातील ५०% शेतकऱ्यांचे विम्याचे दावे देखील विमा कंपन्या मार्फत फेटाळले गेले. यावर्षी जायकवाडी, येलदरी, दुधना, सिद्धेश्वर या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असूनही शेतीसाठी सोडले जात नाही. विशेष म्हणजे ग्रामीण भागात १६ तास विजेचे भार नियमन असल्याने शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी देता येत नाही.

- Advertisement -

पीक विमा भरतानाच ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून नोंदणी केलेली असताना सुद्धा त्यांना ऑनलाईन तक्रारी करा, असे शेतकऱ्यांना सांगण्यात येते. सर्वच बाजूने शेतकरी भरडला जात असल्याची वास्तव त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडले.

यावेळी आमदार व परभणी जिल्ह्याचे संपर्कप्रमुख रविंद्र वायकर, ज्योतिताई ठाकरे, खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे, विवेक नावंदर, सुधाकर खराटे, गंगाप्रसाद घुगे, सखुबाई लटपटे, अर्जुन सामाले, दिपक बारहाते, अंबिकताई डाके, राजू कापसे पाटील, संजय गाडगे, सुरेश बावकर. यांच्यासह जिल्ह्यातील सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


हेही वाचा : आयोगाने पक्षपातीपणा करू नये, दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयानंतर राऊतांची प्रतिक्रिया


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -