घर ताज्या घडामोडी खारघर दुर्घटना : सरकारची भूमिका स्पष्ट नसल्याने न्यायासाठी राज्यपालांची भेट घेतली -...

खारघर दुर्घटना : सरकारची भूमिका स्पष्ट नसल्याने न्यायासाठी राज्यपालांची भेट घेतली – दानवे

Subscribe

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्त्वात आमदारांच्या एका शिष्टमंडळाने आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली. खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या उष्माघात आणि चेंगराचेंगरी यामुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी शिष्टमंडळाने भेट घेतली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्त्वात आमदारांच्या एका शिष्टमंडळाने आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली. खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या उष्माघात आणि चेंगराचेंगरी यामुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटीनंतर अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सरकारवर हल्लाबोल केला. तसेच, राज्यापालांच्या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली याबाबत माहिती दिली. (Ambadas Danve Slams Shinde Fadnavis Government On Kharghar Incident Meet Governor)

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्त्वात आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांना माहिती देण्यात आली. यावेळी शिवसेना (उबाठा) नेते अंबादास दानवे यांनी सांगितले की, “खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या उष्माघात आणि चेंगराचेंगरीमुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र या घटनेसंदर्भात सरकारने कोणतीही भूमिका, प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. याप्रकरणी न्याय मागण्यासाठी आम्ही शिवसेनेच्या आमदारांच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली”.

- Advertisement -

“एवढी मोठी घटना घडल्यानंतर आकड्याबाबत संभ्रम आजही कायम आहे. खरोखर किती लोक गेले, यात किती मृत्यू झाले याची पोलीस ठाण्यात नोंद आहे की नाही किमान अपमृत्यू म्हणून तरी नोंद आहे की नाही हे आम्ही राज्यपालांना विचारलं आहे. सदोष मनुष्यवध हा गुन्हा नंतर दाखल होईल, मात्र पहिले पोलिसांनी अपमृत्यूची नोंद दाखल करण्याची आवश्यकता असते. 100 जणांचा कार्यक्रम घेताना देखील पोलीस नियम सांगतात, निमय मोडले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमची असं सांगतात”, असे अंबादास दानवे म्हणाले.

“हीच घटना राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात किंवा लग्नसमारंभात घडली असती तर सरकारने काय पाऊलं उचलली असती? म्हणून याच्यासंदर्भात राज्यपालांना आम्ही राज्य सरकारने जो कार्यक्रम आयोजित केला त्याची पत्रिका आम्ही सादर केली आहे. निवेदन सादर केले आहे आणि राज्यपालांनी तातडीने या घटनेप्रकरणी मृत्यूंची नोंद किमान अपमृत्यू म्हणून तरी होण्याची मागणी केली आहे”, असे अंबादास दानवे यांनी सांगितले.

- Advertisement -

“पोलीस दलातील संबंधित अधिकाऱ्यांची देखील ही जबाबदारी आहे. त्यांच्यावर तरी किमान कारवाई झाली पाहिजे”, अशी मागणीही दावने यांनी केली. दरम्यान, “13-14 कोटी खर्च करून देखील आलेल्या श्रीसदस्यांसाठी साधा मंडप टाकण्यात आला नव्हता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती, साधे दोन बिस्कीट देखील नव्हते आणि मग 14 कोटी रुपये कशासाठी केले? कुणी केले?”, असे प्रश्नही राज्यपालांसमोर मांडल्याचे दानवे यांनी सांगितले.

संबंधित दोषींविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यास शासनास निर्देश द्यावेत

खारघर येथील घटना ही मानव निर्मित आपत्ती असल्याने राज्य सरकार सत्य परिस्थिती दडविण्याचा प्रयत्न करीत आहे. ही घटना महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारी आहे. त्यामुळे सदर घटनेची सत्य परिस्थिती जनतेसमोरे येणे आवश्यक आहे. तसेच, भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी सदर प्रकरणी आपण उच्च स्तरिय चौकशी करून संबंधित दोषींविरुध्द सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदविण्यास शासनास निर्देश द्यावेत,अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने राज्यपाल यांना दिले.


हेही वाचा – हे निंदनीय, वैयक्तिक द्वेषातून मोदींचा एकेरी उल्लेख, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका

- Advertisment -