Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रThackeray Brothers : निवडणुकीत पराभव झाल्याने...; ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत दानवेंचे सूचक...

Thackeray Brothers : निवडणुकीत पराभव झाल्याने…; ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत दानवेंचे सूचक वक्तव्य

Subscribe

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी चर्चा रंगू लागली आहे. यासंदर्भात आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. महत्त्वाचे म्हणजे शिवसेना फुटीनंतर ठाकरे गटाने 95 जागांवर निवडणूक लढविली, पण त्यांना केवळ 20 जागा विजय मिळवण्यात यश आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधून बाहेर पडून पुढील निवडणुका स्वतंत्र लढवल्या पाहिजेत, अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्यांकडून होताना दिसत आहे. तर दुसरीकडे भाजपाला पाठिंबा देऊनही पहिल्यांदाच विधानसभेत मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही. त्यामुळे मराठी माणसासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी चर्चा रंगू लागली आहे. यासंदर्भात आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सूचक वक्तव्य केले आहे. (Ambadas Danve suggestive statement on Thackeray brothers coming together)

माध्यमांशी संवाद साधताना अंबादास दानवे यांना प्रश्न विचारण्यात आला की, ठाकरे ब्रँड पुन्हा एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत, यावर आपल्याला काय वाटते? या प्रश्नावर दानवे म्हणाले की, निवडणुकीत पराभव झाला की, अशा चर्चा सुरू होतात. मागच्या निवडणुकांवर नजर टाकल्यास लक्षात येईल की, निकालानंतर काही दिवस अशी चर्चा रंगली होती. मात्र त्यानंतर ती चर्चा मागे पडली. त्यामुळे आता एकत्र यायचे की नाही, याबद्दल ते दोन नेतेच ठरवू शकतात. त्यात आम्ही काहीच बोलू शकत नाही, अशी भूमिका दानवे यांनी मांडली.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra CM : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी माझे नाव…; काय म्हणाले मुरलीधर मोहोळ

राज ठाकरेंनी योग्य तो धडा घ्यावा

दरम्यान, राज ठाकरेंनी भाजपाला पाठिंबा दिल्याच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारला असता अंबादास दानवे म्हणाले की, राज ठाकरेंची ही भूमिका कुणालाच कळलेली नाही. खरं तर ते सरकारच्या विरोधात होते की, सरकारच्या बाजूने होते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की, राज ठाकरे जर सरकारच्या बाजूने होते, तर त्यांनी त्यांच्याच विरोधात निवडणुकीला आपले उमेदवार उभे केले होते आणि विरोधात होते तर त्यांनीच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला होता. राज ठाकरेंच्या अशा भूमिकेमुळे जनतेनेही आपला निर्णय घेतला. यातून राज ठाकरेंनी योग्य तो धडा घ्यावा, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला.

- Advertisement -

हेही वाचा – Pawar Vs Shinde : ‘CM’पद ‘Bjp’ कडे, दुसऱ्या क्रमांकासाठी शिंदे अन् अजितदादांमध्ये रस्सीखेच; भाजपचे बडे नेते म्हणाले, “तिघेही…”


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -