घरमहाराष्ट्रनागपूरAmbadas Danve : वसई-विरार महानगरपालिकेत पाणीपुरवठा योजना लागू करावी; अंबादास दानवे यांची...

Ambadas Danve : वसई-विरार महानगरपालिकेत पाणीपुरवठा योजना लागू करावी; अंबादास दानवे यांची मागणी

Subscribe

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आज (8 डिसेंबर) दुसऱ्या दिवशी सभागृहात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वसई-विरार महानगरपालिकेत पाणी पुरवठा योजना लागू करावी आणि विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क अदा करण्याची मागणी केली आहे. (Water supply scheme should be implemented in Vasai Virar Municipal Corporation Ambadas Danve demand)

अंबादास दानवे म्हणाले की, वसई-विरार महानगरपालिकेच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेता, त्याठिकाणी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात यावी. शहर आणि 69 गावांना प्रथम प्राधान्याने पाणी मिळेल, यासाठी तातडीने हो योजना लागू करावी, तसेच योग्य पाणी मिळावे यासाठी 69 गावांना अतंर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात यावी.

- Advertisement -

हेही वाचा – Pimpri Chinchwad Fire : अजित पवारांकडून आर्थिक मदत तर, सुप्रिया सुळेंकडून सखोल चौकशीची मागणी

वसई-विरार महानगरपालिका 3 जुलै 2009 रोजी स्थापन झाली होती. यावेळी समाविष्ट करण्यात आलेली उपरोक्त 69 गावांना पाणीपुरवठा नसल्याने या गावातील हजारो रहिवाशांना कुंप नलिकेचे क्षारयुक्त पाणी प्यावे लागते. यामुळे अनेक नागरिकांना दुर्धर आजाराला सामोरे जावे लागत असल्याची माहिती दानवे यांनी सभागृहात देत वसई-विरार महानगरपालिकेतील पाण्याचा प्रश्न सभागृहात लावून धरल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क अदा करण्याची मागणीही केली.

- Advertisement -

अंबादास दानवे म्हणाले की, 2019 मध्ये 13 हजार 521 पदांसाठी 34 जिल्हा परिषदांमध्ये जिल्ह्यात भरती प्रक्रिया घेण्यात आली. मात्र विविध कारणांनी भरती प्रक्रिया रेंगाळली. या भरतीसाठी परीक्षा शुल्कापोटी घेण्यात आलेले 33 कोटी रुपये त्या-त्या विभागाकडे व ग्रामविकास विभागाकडे जमा झाले. मात्र 4 वर्षे झाली तरी विद्यार्थ्यांना पैसे परत मिळाले नाही. त्यामुळे जे विद्यार्थी नव्याने परीक्षेसाठी अर्ज करतील, त्यांचे शुल्क न घेण्याची तरतूद करावी. यात अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ओलांडली आहे, त्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क त्यांच्या खात्यात जमा करावे, अशी मागणी आज सभागृहात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारकडे केली. अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले.

हेही वाचा – Onion Export Ban : कांद्यावरील निर्यातबंदी केंद्र सरकारने उठवावी; शिंदे गटाची केंद्रीय उद्योगमंत्र्यांकडे मागणी 

पैसे परत देण्याबाबात शासन निर्णय झाला

गिरीश महाजन म्हणाले की, परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे पैसे परत देण्याबाबत शासन निर्णय झाला असून विविध माध्यमातून त्याची प्रसिद्धी केली जात असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रश्नावर देण्यात आली. जिल्हा परिषदांमधील भरती प्रक्रियेसाठी जमा केलेलया प्रवेश शुल्काची रक्कम अद्याप अदा करण्यात आली नाही. ऑनलाइन जरी असले तरी त्याचे व्हेरीफिकेशन केले जाणार आहे. पडताळणी केल्यानंतर सगळ्यांना रक्कम अदा करण्यात येईल, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -