घरक्राइममनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास आता NIA करणार

मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास आता NIA करणार

Subscribe

मनसुख हिरेन हत्येचा तपास आता एनआयए करणार आहे. एनआयए आता स्कॉर्पिओ चोरीला गेली तेथून तपासाची सुरुवात करणार आहे. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर परिसरात आढळला होता. त्यांच्या हत्येचा तपास ATS करत होतं. दरम्यान, आता हा तपास NIA कडे सोपवण्यात आला आहे.

मनसुख हिरेन हत्येचा तपास NIA कडे सोपवल्यानंतर एनआयए आता स्कॉर्पिओ चोरीला गेली तेथून तपासाची सुरुवात करणार आहे. मनसुख हिरेन यांचे वकील गिरी यांना एनआयएने चौकशी साठी बोलवले आहे. विक्रोळी पोलीस ठाण्यातील संबधीत पोलिसांची चौकशी करण्यात येणार आहे. एटीएसने ठाणे गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याची मनसुख हिरेन प्रकरणात चौकशी केली होती. एनआयए या अधिकाऱ्याला चौकशीला बोलावून घेणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -