मुकेश अंबानी यांना मुंबईसह जगभर सुरक्षा पुरवा, सर्वोच्च न्यायालयाने निर्देश

Ambanis To Get Z+ Security Cover | मुकेश अंबानी यांना महाराष्ट्र आणि भारतापुरतेच नव्हे तर जगभर Z+ सुरक्षा देण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहे.

mukesh ambani family

Ambanis To Get Z+ Security Cover | नवी दिल्ली – रिलायन्स समूहाचे (Reliance Industry) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मुकेश अंबानी यांना महाराष्ट्र आणि भारतापुरतेच नव्हे तर जगभर Z+ सुरक्षा (Z+ Security Cover) देण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहे. त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या एका आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा – मुकेश अंबानी झाले आजोबा, मुलगी ईशाला झाले जुळे

मुकेश अंबानी हे जगभरातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगांच्या यादीत मोडतात. त्यामुळे त्यांची सुरक्षा फार महत्त्वाची आहे. मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी आणि त्यांची तीन मुलं आकाश, अनंत आणि इशा यांना धमकीचे फोन आले होते. याप्रकरणी कागदपत्रे आणि पुरावे सादर करण्याचे निर्देश त्रिपुरा उच्च न्यायालयाने केंद्रीय गृहमंत्रालयाला दिले.

मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना देशातील सर्वोच्च दर्जाची झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात यावी. मुंबई आणि महाराष्ट्रापुरतीच मर्यादित न ठेवता ही सुरक्षा जगभर पुरवली जावी. मुंबई आणि महाराष्ट्रात सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल तर, त्याबाहेर सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असेल. सुरक्षेचा संपूर्ण खर्च मुकेश अंबानी स्वतः करतील, असे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात म्हटलं आहे.

हेही वाचा – श्रीमंतांच्या यादीतून भारतीय गायब, अदानींनंतर अंबानीही आऊट

एखाद्या व्यक्तीच्या जीवितास धोका असेल तर संबंधिताला सुरक्षा पुरवली गेली पाहिजे. ही सुरक्षा व्यक्तीच्या खर्चान पुरवली जाणे. सुरक्षा पुरवताना क्षेत्राची मर्यादा न ठेवता जगभर ही सुरक्षा पुरवली जाणे गरजेचे आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.