Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र आंबेडकरांना आघाडी करायचीच नव्हती

आंबेडकरांना आघाडी करायचीच नव्हती

Subscribe

भाजपविरोधी महाआघाडीची स्थापना व्हावी, म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला १० जागा देण्याची तयारी काँग्रेस पक्षाने केली होती. यासाठी आंबेडकर यांच्या जवळपास सात सभा झाल्या. पण आज सांगतो, उद्या सांगतो, असे निमित्त करत आंबेडकर यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून ठरवून वेळ घालवला, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. आंबेडकर हे २२ जागांचा हट्ट धरून बसले होते. पण ते शक्य नव्हते म्हणूनच यात तडजोडीचा मार्ग म्हणून १० जागा देण्याची तयारी काँग्रेस पक्षाने केली होती, असे पाटील म्हणाले. आंबेडकर हे जाणीवपूर्वक वेळ घालवत होते.

चर्चा पुढे सरकत असतानाच ते मध्येच आपली मागणी दामटवण्याचा प्रयत्न करत होते. ४८ जागांपैकी आमच्या पक्षाच्या वाट्याला येणार्‍या जागांपैकी वंचित बहुजन आघाडीला २२ देणे हे केवळ अशक्यच होते. ही मागणी मान्य होणार नाही, हे ही आंबेडकर पुरते जाणून होते. त्यांनी हे सगळे ठरवून केले. कुणाच्या तरी सांगण्यावरून पार्ट बी म्हणून वंचित बहुजन आघाडी काम करत असल्याचे चित्र आंबेडकरांच्या एकूणच देहबोलीवरून निर्माण झाले होते. हर्षवर्धन पाटील हे आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारानिमित्त ते शहरात आले होते.

- Advertisement -

मतांचे विभाजन टाळण्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र करण्याचा आमचा प्रयत्न होता. त्यामुळे आंबेडरांना १० जागा देऊ केल्या होत्या. मात्र ते २२ जगांवर अडून राहिले. त्यांची ही मागणी कुणाच्यातरी सांगण्यावरून होत असल्याचे आमच्या लक्षात आले. महाआघाडीविरोधात उमेदवार उभे करणे हा सगळा त्यांचा ठरवून केलेला कार्यक्रम असल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -