घरमहाराष्ट्रआंबेनळी बस अपघाताला प्रकाश सावंत देसाई जबाबदार - मृतांच्या नातेवाईकांचा आरोप

आंबेनळी बस अपघाताला प्रकाश सावंत देसाई जबाबदार – मृतांच्या नातेवाईकांचा आरोप

Subscribe

आंबेनळी बस अपघाताला दुसरे तिसरे कोणी ही जबाबदार नसून बचावलेले प्रकाश सावंत देसाईच जबाबदार असल्याचा आरोप अपघातातील मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. मृतांच्या नातेवाईकांनी बुधवारी थेट विद्यापीठावर धडक देत आपला संताप व्यक्त केला.

रायगडच्या पोलादपूर घाटामध्ये झालेल्या बस अपघाताला दुसरे तिसरे कोणी ही जबाबदार नसून बचावलेले प्रकाश सावंत देसाईच जबाबदार असल्याचा आरोप अपघातातील मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे प्रकाश सावंत देसाई यांना विद्यापीठाच्या सेवेतून बडतर्फ करा, सीआयडीमार्फत चौकशी करा आणि त्यांची नार्को टेस्ट करा. यामध्ये जर ते दोषी आढळल्यास त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी थेट विद्यापीठावर धडक देत आपला संताप व्यक्त केला आहे.

बचावलेले प्रकाश यांच्या विधानांमध्ये विसंगती

रायगडच्या पोलादपूर घाटामध्ये खासगी बस दरीमध्ये कोसळून ३३ जणांचा मृत्यू झाला असून या आंबेनळी बस अपघातात प्रकाश सावंत देसाई बचावले होते. या अपघाताला दुसरे तिसरे कोणी ही जबाबदार नसून बचावलेले प्रकाश सावंत देसाई जबाबदार असल्याचा आरोप अपघातातील मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. एवढा मोठा अपघात झाला असून देखील प्रकाश सावंत देसाई माध्यमांकडे वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत होते. ज्या ठिकाणी बस दरीत कोसळली तो संपूर्ण भाग खोल होता. तिथे मातीचा लवलेशही नव्हता. मृतांना काढण्यासाठी ज्या ट्रेकर्सना बोलावण्यात आले होते. त्या ट्रेकर्सना देखील मृतांना बाहेर काढताना लागले होते. मात्र ही बस चार वेळा उलटून देखील प्रकाश सावंत देसाई बाहेर फेकले कसे गेले नाहीत ते कोणत्याही साधनाशिवाय वर कसे येऊ शकतात. त्यांच्या विधानांमध्ये विसंगती असून हाच गाडी चालवत होता आणि हेच या अपघाताला कारणीभूत असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे.

- Advertisement -

या अपघातात ३३ प्रवासी दगावले

बाळासाहेब सावंत दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी विकेंडसाठी बसने महाबळेश्वर सहलीसाठी निघाले होते. पोलादपूर तालुक्यातील दाभिळ आणि आंबेमाची गावालगतच्या आंबेनळी घाटात ही बस ३०० फूट दरीत कोसळून ३३ प्रवासी दगावले आणि एकजण वाचले आहेत. काही क्षणांतच काळाने घाला घालून विकेंडचा शनिवारीच दी एण्ड केला.

‘त्या’ चार तासांत काय घडलं?

  • चौथा शनिवार आणि रविवार म्हणून कोकण कृषी विद्यापीठाचे ४० जण महाबळेश्वरला सहलीसाठी निघाले होते.
  • बसमध्ये सीट्स कमी असल्यामुळे ४० ऐवजी ३४ जणांना घेऊन ही बस ६.३० वाजता दापोलीवरून महाबळेश्वरच्या दिशेने निघाली.
  • कोकण कृषी विद्यापीठाचीच बस भाड्याने घेण्यात आली होती.
  • निघालेली ही खासगी बस सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास पोलादपूर-आंबेनळी घाटातून जात होती.
  • निघालेली ही बस डाव्या बाजुने रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगार्‍यावरुन खोल दरीत कलंडली.
  • कळायच्या आतच ही बस ३०० फूट खोल दरीत कोसळली.
  • घडला ते ठिकाण अवघड वळणाचे किंवा अपघातग्रस्त ठिकाण नव्हते.
  • दरीत कोसळत असताना, त्याच बसमध्ये प्रवास करत असलेले प्रकाश सावंत-देसाई हे बसमधून बाहेर फेकले गेले.
  • जिथे पडले तिथून बस खूप खाली कोसळली होती.
  • येताच हाताला लागेल त्याचा आधार घेत प्रकाश सावंत सुखरूप वर आले.
  • येताच त्यांनी जवळ असलेल्या त्यांच्या मोबाईलवरुन नातेवाईकांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. रेंज नसल्यामुळे त्यांचा कुणाशीच संपर्क होऊ शकला नाही.

वाचा – पोलादपूर बस दुर्घटना; ३२ जणांचा मृत्यू तर एक जण बचावला

- Advertisement -

वाचा – असा झाला पोलादपूरचा अपघात

वाचा – विकेंडचा दि एण्ड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -