घरCORONA UPDATECoronavirus : कोरोनामुळे अमेरिकन नागरिक जास्त चिंतीत - अमेरिकन संस्थेचा सर्व्हे

Coronavirus : कोरोनामुळे अमेरिकन नागरिक जास्त चिंतीत – अमेरिकन संस्थेचा सर्व्हे

Subscribe

जगभरात कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत लोक सर्वाधिक त्रस्त आहेत. अमेरिकी संस्था वंडरमॅन थॉम्पसन डेटाच्या सर्व्हे ही याच गोष्टीचा खुलासा झाला आहे.

कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेतील ५ लाख ३० हजाराहून अधिक लोक संक्रमित आहेत. तसेच २१ हजाराहून अधिक लोक मरण पावली आहेत. जगभरात कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत लोक सर्वाधिक त्रस्त आहेत. अमेरिकी संस्था वंडरमॅन थॉम्पसन डेटाच्या सर्व्हे ही याच गोष्टीचा खुलासा झाला आहे. या संस्थेने अमेरिकेतील युवांचा एक सर्व्हे मार्च महिन्यात केला होता. सर्व्हेनुसार ही बाब समोर आली की, अमेरिकेत जेष्ठांच्या तुलनेत १८ ते २४ वयोगटातील युवा ५ पटीने चिंतीत आहेत. याशिवाय ७७ टक्के लोक दर दोन तासाला हात धुवत आहेत. ५२ टक्के नाईट क्लब आणि ६६ टक्के नागरिकांनी बार व रेस्टॉरंटमध्ये जाणे सोडले आहे. तसेच ६८ टक्के लोकांनी हातमिळवणी करणे सोडले आहे.

अमेरिकन युवांची वाढती चिंता

अमेरिकी संस्था वंडरमॅन थॉम्पसन डेटाचे मुख्य रिसर्चर मार्क ट्रस म्हणतात की, अमेरिकन एका वेळेला एकाच गोष्टीपासून चिंतीत असतात. परंतु कोरोना व्हायरसमुळे लोक सर्वाधिक चिंतीत झालेले दिसून येत आहेत. यात आरोग्य, नोकरी आणि अर्थव्यवस्था यांचा समावेश आहे. कोरोना संबंधित सर्व्हेमध्ये जो प्रतिसाद मिळाला, त्याप्रमाणे चिंतेचा स्तर ३६ टक्के आहे. परंतु इराण युद्ध आणि कोरोना यामध्ये खुप फरक आहे. आता संसर्ग आणि मत मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे युवामध्ये चिंता वाढत आहे.

- Advertisement -

नागरिकांना नोकऱ्यांची धास्ती

सर्व्हेनुसार न्यूयॉर्क, न्यू जर्सी, कॅलिफोर्निया, वाशिंग्टन आणि मिशिगन राज्याचे लोक जास्त चिंतीत आहेत. परिस्थिती लवकरात लवकर सुधारली नाही तर येत्या आठवड्यात आणि महिन्यात चिंतेचा स्तर वाढण्याची शक्यता आहे. सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या या राज्यातील लोकांमध्ये खाण्या-पिण्याच्या वस्तूंची उपलब्धता, कमी वेगाने चालणारे इंटरनेट आणि अशांती या मुद्द्यांपेक्षा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आणि नोकरी जाण्याची जास्त चिंता आहे. यात एक गोष्ट प्रामुख्याने दिसून आली की, जुन्या विचाऱ्यांच्या लोकांच्या तुलनेत उदार मताच्या लोकांमध्ये कोरोना बाबत जास्त काळजी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -