AUPBx कडून बिझनेस एक्सचेंज पुरस्काराचे आयोजन; कलाकार, उद्योजकांचा होणार सन्मान

amhi udyogini pratishthan business exchange awards 2022 to be held on 17th december

छोट्या उद्योगधंद्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून काम करणाऱ्या एयूपीबीक्स संस्थेमार्फत यंदा प्रथमच ‘आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान बिझनेस एक्सचेंज पुरस्कार’ 2022 सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा 17 डिसेंबर 2022 रोजी पार पडणार आहे. एयूपीबीक्समार्फत भारतातील कलावंत, उद्योजक, स्टार्टअप्सचा आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान बिझनेस एक्सचेंज पुरस्कार’ देत सन्मान करणार आहे.

उद्योजक, कलावंत, शेफ्स आणि छोट्या व्यावसायिकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले, यासाठी आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठापना गेल्या 25 वर्षांपासून कार्यरत आहे. स्त्री उद्योजकतेचा पुरस्कार करण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली. मात्र संस्थेचे व्यासपीठ वाढ असताना त्यात समावेशकतेचा पर्याय यावा म्हणून स्त्रियांसह पुरुष उद्योजकतेचा पुरस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.

या पुरस्कार सोहळ्यात पुरुष आणि स्त्रिया दोन्ही सहभागी होऊ शकतात. यासाठी ऑनलाईन आणि फोनच्या माध्यमातून मुलाखती घेणे आम्ही सुरू केले आहे, अशी माहिती ‘आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान’च्या ट्रस्टी मधुरा मोहाडीकर यांनी दिली. या मुलाखतीतून निवडलेल्या 100 उमेदवारांना व्यक्तिमत्त्व विकास, उद्योजका, डिजिटल मार्केटिंग आणि योगाच्या माध्यमातून तणाव व्यवस्थापनाचे २ दिवसांचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल. विजेत्यांची निवड करण्यासाठीच्या समितीत प्रसिद्ध लेखक आणि अभिनेते भरत दाभोलकर, अभिनेत्री सविता प्रभुणे, ‘आसियान’चे व्यवस्थापकीय संचालक अमित वायकर आणि प्रख्यात फूड मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. दीपा भाजेकर यांचा समावेश आहे. या पुरस्कारासाठी उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज करावेत, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा मीनल मोहाडीकर यांनी केली

आम्ही उद्योगिनी ट्रस्ट विषयी

१९९७ साली महिला दिनी स्थापन झालेल्या आम्ही उद्योगिनीचे रूपांतर एका छोट्या उपक्रमापासून आज एका मोठ्या संस्थेत झाले आहे. संस्थेने स्त्री सबलीकरणाचा एक उपक्रम म्हणून आपली सुरुवात केली आणि स्त्रियांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन दिले पण लवकरच काळासोबत बदलण्याचा व समावेशक होण्याचा निर्णय संस्थेने घेतला. संस्थापक सदस्या श्रीमती मीनल मोहाडीकर यांचे द्रष्टे नेतृत्व संस्थेला लाभले आहे. श्री. व्ही. व्ही. देशपांडे, श्रीमती रजनी दांडेकर, श्री. प्रदीप वर्मा, श्रीमती पुष्पा त्रिलोकेकर आदी प्रख्यात उद्योजक व्यावसायिकांचा पाठिंबा व मार्गदर्शन संस्थेला लाभले आहे. संस्थेचे मुख्यालय मुंबईत दादर (पश्चिम) येथे आहे, तर नवी मुंबई, कल्याण, बोरिवली, ठाणे, गोरेगाव, पुणे, नाशिक, रत्नागिरी, औरंगाबाद व दुबई येथे संस्थेच्या शाखा आहेत. आगामी एयूपीबीएक्स पुरस्कार ट्रस्टतर्फे प्रथमच आयोजित केले जात आहेत आणि भारतभरातील उद्योजकांची संख्या वाढवण्याच्या उद्देशाने हे पुरस्कार दिले जाणार आहेत.


दिल्ली एम्स रुग्णालयातील सायबर हल्ल्याप्रकरणी दोघांचे निलंबन, पोलिसांकडून तपास सुरु