घरमहाराष्ट्रCoronavirus: नाताळसाठी राज्य शासनाची नियमावली जाहीर; जाणून घ्या नियम

Coronavirus: नाताळसाठी राज्य शासनाची नियमावली जाहीर; जाणून घ्या नियम

Subscribe

कोरोनाच्या नव्या प्रकाराची माहिती मिळताच महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये सावधगिरीची पावलं

राज्यातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे यंदा कोरोनाचा कहर सुरू असताना या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षातील सर्वच सण साधेपणाने साजरा केले जात आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ख्रिश्चन धर्मियांच्या नाताळ सणासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. तर या सणाच्या निमित्तानेही राज्यशासनाने जनतेला आवाहन केले आहे. कोरोनामुळे उद्‌भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी नाताळ उत्सव साध्या पद्धतीने व गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार साजरा करावा, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. कोरोनाच्या नव्या प्रकाराची माहिती मिळताच महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये आतापासूनच सावधगिरीची पावलं उचलली जात आहेत.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. ५ जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू, संचारबंदीचे हे नियम लागू असतील. शिवाय नाताळ सण साजरा करण्यासाठीही ठराविक नियमांचं सर्वांना पालन करावे लागणार आहे.

- Advertisement -

नाताळ साजरा करण्यासाठीचे असे असतील नियम

ख्रिश्चन बांधवांनी या वर्षीचा नाताळचा सण साध्या पद्धतीने साजरा करावा. नाताळ सणानिमित्त चर्चमध्ये जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. चर्चमध्ये त्यावेळी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व फिजिकल डिस्टन्सिंग राखले जाईल याची प्रामुख्याने काळजी घ्यावी. विशेष म्हणजे चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

नाताळ सणाच्या दरम्यान चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री असे काही वस्तू ठेवल्या जातात. ते पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात. त्या ठिकाणी देखील शारिरीक अंतर (फिजिकल डिस्टन्सिंग) व स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत (Choir) गाण्यासाठी जास्तीत जास्त १० गायकांचा (Choirsters) समावेश करण्यात यावा. त्यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर करुन फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे.

- Advertisement -

आपल्या घरातील ६० वर्षावरील नातेवाईक तसेच १० वर्षाखालील लहान बालक यांच्या सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने त्यांची काळजी घेण आवश्यक आहे. शक्यतोवर त्यांनी घराबाहेर जाणे टाळावे व नाताळ घरामध्येच साजरा करावा. आयोजकांनी त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रार्थनेची (Online Masses) सुविधा उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करावी. ज्याचा लाभ घरी असणाऱ्या व्यक्तींनाही होईल. त्याचप्रमाण कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होणार नाही अशा धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणूकांचे आयोजन करण्यात येऊ नये. फटाक्याची आतिषबाजी करु नये. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटेकोर पालन करावे.

नाताळ सणासाठी आखून दिलेल्या या नियमावलीचे पालन करत नागरिकांनी प्रशासनाला मदत करत कोरोना नियंत्रणात ठेवण्याच्या या युद्धात हातभार लावावा असेच जाहीर आवाहन करण्यात येत आहे.


देशातल्या शेतकऱ्यांसाठी आज काळा दिवस – संजय राऊत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -