Wednesday, August 4, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी काँग्रेसनं स्वबळावर लढावं ही पक्षातील कार्यकर्त्यांची अपेक्षा, अमित देशमुखांचा स्वबळाच्या नाऱ्याला पाठिंबा

काँग्रेसनं स्वबळावर लढावं ही पक्षातील कार्यकर्त्यांची अपेक्षा, अमित देशमुखांचा स्वबळाच्या नाऱ्याला पाठिंबा

काँग्रेसनं दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही - अमित देशमुख

Related Story

- Advertisement -

काँग्रेस नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्याला पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावरुन नाराजी पसरली आहे. यावरुन अमित देशमुख यांनी काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महाविकास आघाडीला कोणताही धोका नसल्याचे म्हटलं आहे. तसेच काँग्रेसनं स्वबळावर लढावं अशी पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची आपेक्षा आहे. आपला पक्ष मोठा करावा असे प्रत्येकाला वाटतं आणि तसं करण्यात काही गैर नसल्याचे अमित देशमुख यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख औरंगाबादमध्ये बोलत होते. यावेळी देशमुखांनी स्वबळाच्या नाऱ्याला पाठिंबा दिला आहे. तसेच स्वबळाच्या नारा दिला याचा वेगळा अर्थ काढणे चुकीचं आहे. काँग्रेसनं दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महाविकास आघाडीला कोणताही धोका नसल्याचा दावा अमित देशमुख यांनी केला आहे. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुक काँग्रेसनं स्वबळावर लढावं अशी पक्षातील कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. याबाबत विचार करण्यात येईल असेही अमित देशमुख यांनी म्हटलं आहे.

नाना पटोले यांचा स्वबळाचा नारा

- Advertisement -

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या स्वबळाच्या नाऱ्याबाबत भूमिका स्पष्ट ठेवली आहे. नाना पटोले यांनी यापुर्वीच म्हटलं आहे की, महाविकास आघाडी सरकार स्थापन करतानाच काँग्रेस सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. यामुळे काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे राज्य सरकारला कोणताही धोका नाही. महाविकास आघाडी सरकार हे ५ वर्षांचा कालावधी यशस्वी पुर्ण करणार आणि मुख्यमंत्री पदी उद्धव ठाकरेच असणार अस नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रवादीचा नाना पटोलेंना टोला

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसच्या स्वबळाच्या भूमिकेवरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टोला लगावला आहे. ज्यांना जे करायचं आहे ते त्यांनी करावं, कोणी कोणाला अडवून ठेवलं नाही. आघाडीचे सरकार आहे यामुळे ज्यांना काही करायचे आहे त्यांनी ते करावं यावर आम्ही रोज का उत्तरे द्यावी असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे. काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयाबाबत पक्ष नेतृत्तव निर्णय घेतील असेही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -