Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र अमित राज ठाकरे : गर्दीत रमणारा "ठाकरे"

अमित राज ठाकरे : गर्दीत रमणारा “ठाकरे”

Subscribe

नाशिक : प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर राज, उद्धव ते थेट आदित्य आणि अमित यांच्यापर्यंत या सगळ्यांच्या “ठाकरे” ब्रॅंडच एक वेगळच गारुड महाराष्ट्रावर राहील आहे. ठाकरे म्हणजे गर्दी, लोकांच आकर्षण ही समीकरण वर्षानुवर्षे आहे. आजूबाजूला सतत गर्दी असूनही कधी कुठले ठाकरे थेट गर्दीत सहभागी झाल्याचे दिसले नाही. त्याची कारणेही अनेक आहेत. पण, या सगळ्यात एक ठाकरे असा आहे जो थेट गर्दीत शिरतो. लोकांमध्ये वावरणे त्याला आवडते. मानमोकळेपणाने प्रत्येकाला वेळ देतो, हस्तांदोलन देतो, त्यांचे प्रश्न ऐकून घेतो, सेल्फीचा हट्ट पुरवतो. तो ठाकरे म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मागील काही वर्षात अगदी सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे जमिनीपासून राजकारणात सुरवात करून आज पक्षाची युवा आघाडी असलेल्या मनविसेची महाराष्ट्रभर बांध-बंदिस्ति मजबूत करण्यासाठी झटत असलेले अमित राज ठाकरे..

अमित ठाकरे हे अत्यंत संवेदनशील, नम्र, मनमिळावू व्यक्तिमत्वाचे धनी आहेत असे त्यांना भेटणारा प्रत्येक माणूस सांगतो. ठाकरे कुटुंबाच्या एकूण स्वभावापेक्षा वेगळा आणि थेट गर्दीत घुसून सामान्य माणसात रमणारा ठाकरे म्हणजे राजपुत्र अमित ठाकरे असे त्यांना अनुभवणारा प्रत्येकजण आवर्जून सांगतो. तसेच ते प्रचंड संवेदनशीलही आहेत असेही अनेक उदाहरणातून दिसून आले आहे. हा त्यांचा दिलखुलास स्वभाव त्यांच्या आईकडून त्यांच्याकडे आल्याचंही म्हंटल जाते.

अमित पुन्हा नाशिक दौऱ्यावर 

- Advertisement -

अमित ठाकरे पुढील आठवड्यात पुन्हा नाशिकला भेट देणार आहे. मनविसेचे अध्यक्ष राजपुत्र अमित ठाकरे यांच्याकडे मागील वर्षभरापासून नाशिक मनसेची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. राज ठाकरे यांच्या या महत्वपूर्ण दौर्‍यानंतर पुन्हा एकदा नाशिक मधील संघटना गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून अमित ठाकरे पुढील आठवड्यात सोमवारी (दि.२९) पुन्हा नाशिकमध्ये दाखल होत. पुढील कामकाजाबाबत सूचना करण्याची शक्यता आहे.

‘राज’दूत घेणार दर १५ दिवसांनी आढावा

 नाशिक जिल्हा मनसेच्या दृष्टीने बालेकिल्ला समजला जातो. नाशिकमध्ये पूर्वीच्या गतीने आणि सातत्याने काम उभे राहिल्यास भविष्यात यश मिळू शकते असे नेहमीच मनसेच्या वर्तुळात बोलले जाते, त्याच अनुषंगाने संघटना सतत सक्रिय ठेवण्याच्या दृष्टीने दर १५ दिवसांनी राज ठाकरे यांचा एक विशेष दूत येथील कामकाजाचा आढावा घेणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -