Homeमहाराष्ट्रनाशिक - उ. महाराष्ट्रChhagan Bhujbal : पवारांसोबतच्या लिखापढीनंतर भुजबळांच्या अमित शहांशी गुजगोष्टी

Chhagan Bhujbal : पवारांसोबतच्या लिखापढीनंतर भुजबळांच्या अमित शहांशी गुजगोष्टी

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकाच मंचावर एकत्र आले होते. यानंतर आता छगन भुजबळ हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत नाशिक येथील कार्यक्रमात एकाच मंचावर दिसून आले आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली.

मुंबई : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील चाकणमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुर्नाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा काही दिवसांपूर्वीच पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते एकाच मंचावर एकत्र आले होते. महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमात दोन्ही नेते एकमेकांच्या शेजारी बसले होते आणि शरद पवारांनी भुजबळांना एका चिठ्ठीत काही तरी लिहून दिले होते. याबद्दल माहिती देताना पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ, असे म्हणत भुजबळांनी चिठ्ठीत काय लिहिले होते, याबाबत खुलासा करणे टाळले होते. अशातच आता छगन भुजबळ हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत नाशिक येथील कार्यक्रमात एकाच मंचावर दिसून आले आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली. (Amit Shah and Chhagan Bhujbal on the same stage at a program in Nashik)

गेल्या काही दिवसांपासून राज्यात छगन भुजबळ विरुद्ध अजित पवार अशा चर्चा रंगल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख नेते मानले जाणारे छगन भुजबळ यांना मंत्रीपदासाठी डावलण्यात आले. त्यानंतर छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. महत्त्वाचे म्हणजे मागील काही दिवसांपासून छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढत असल्याचे दिसून आले आहे. अलीकडेच शिर्डी येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात छगन भुजबळ यांनी हजेरी लावली होती. मात्र अवघ्या दोन तासात ते माघारी परतले होते. यावेळी सुद्धा छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे छगन भुजबळ आता अजित पवारांसोबत राहणार की नाही? यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. अशातच अमित शहा आणि छगन भुजबळ हे एकत्र दिसून आल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा – Ashish Shelar : तुम्ही अमित शहांच्या पाठीवर वळ उठवणार आहात का? शेलारांचा ठाकरेंना सवाल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मालेगावच्या अजंग येथे उभारलेल्या 538 एकरातील व्यंकटेश्वरा कृषी फार्मला भेट दिली. तसेच शेतकऱ्यांसाठीच्या माती परीक्षण केंद्र व अगरबत्ती कारखान्याचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते. अमित शहा या कार्यक्रमाच्या मंचावर दाखल झाल्यावर त्यांनी छगन भुजबळ यांच्याकडे पाहिले आणि त्यांना बोलवून आपल्या जवळच्या खुर्चीवर बसवले. त्यामुळे मंचावर अमित शहा यांच्या एका बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ बसल्याचे पाहायला मिळाले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ संवाद देखील झाला. अमित शाह यांच्या कृतीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे भविष्यात छगन भुजबळ काही वेगळा निर्णय घेतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा – Supriya Sule : शरद पवारांच्या निवृत्तीवर सुप्रिया सुळेंनी केलं महत्त्वाचं विधान; कोल्हापूरमध्ये म्हणाल्या…