घरताज्या घडामोडी'उद्धवजी, तुम्ही तेव्हा का नाही बोललात?' अमित शहांचा मुख्यमंत्र्यांना सवाल!

‘उद्धवजी, तुम्ही तेव्हा का नाही बोललात?’ अमित शहांचा मुख्यमंत्र्यांना सवाल!

Subscribe

‘मी पुन्हा सांगतो की आम्ही असं कोणतंही वचन केलं नव्हतं. असं मानलं जरी की आम्ही वचन दिलं होतं, तरी उद्धव ठाकरेजी, तुमच्या सर्व प्रचारांच्या बॅनर्सवर तुमच्यापेक्षा अडीच पट मोठा फोटो नरेंद्र मोदींचा लावून तुम्ही प्रचार करत होतात. मोदींच्या नावावर तुम्ही मतं मागत होतात. आम्ही सगळीकडे म्हटलं की देवेंद्र फडणवीस आमचे मुख्यमंत्री होतील. तेव्हा तुम्ही का नाही काही बोललात? असं काहीही बोलणं झालं नव्हतं, असं कोणतंही वचन दिलं नव्हतं. सत्तेच्या लोभापायी बाळासाहेब ठाकरेंच्या सर्व तत्वांना तापी नदीमध्ये टाकून हे सत्तेवर बसले आहेत’, अशी खरमरीत टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेवर केली आहे. सिंधुदुर्गामध्ये लाईफटाईम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

‘मी बंद दाराआड काहीही करत नाही’

यावेळी बोलताना अमित शहांनी भाजप-शिवसेनेची युती ज्या मुख्यमंत्रीपदाच्या वचनामुळे तुटली, त्या वचनाबाबत आपली बाजू मांडली. ‘महाराष्ट्रात मोदीजी आणि फडणवीसांचं नेतृत्वाखाली भाजप-शिवसेनेचं सरकार स्थापन करण्याचा जनादेश होता. जे म्हणतात की आम्ही वचन तोडलं, त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो, की आम्ही वचन पाळणारी लोकं आहोत. अशा प्रकारे खोटं बोलत नाही. बिहारमध्ये नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल असं आम्ही वचन दिलं होतं. आमच्या त्यांच्यापेक्षा जास्त जागा आल्या. त्यांनी म्हटलं देखील की भाजपचा मुख्यमंत्री बनवा. पण भाजपनं ठरवलं की दिलेलं वचन पाळलं जाईल. म्हणून आज नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत. हे म्हणतात आम्ही बंद खोलीत वचन दिलं होतं. मी कधीही काही बंद खोलीत करत नाही. डंके की चोटपर सार्वजनिकरीत्या करतो. कधीही मी बंद दाराआडचं राजकारण केलं नाही. जे होतं, ते सगळ्यांच्या समोर ठामपणे मी बोलतो’, असं अमित शहा म्हणाले.

तर शिवसेना शिल्लक राहिलीच नसती!

आम्ही तुमच्या मार्गावरून चालणार देखील नाही. जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्ही तुमच्या मार्गावरून चाललो असतो, तर तुमच्या पक्षाचं नावनिशाणच राहिलं नसतं. पण आम्हाला चालायचं नाही. तो रस्ता आम्हाला अभिप्रेत नाही. आम्ही जनकल्याणाच्या मार्गावर चालतो.

अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

- Advertisement -

‘पवित्र जनादेशाचा अपमान’

‘मी भाजप अध्यक्ष होतो तेव्हा इथे फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणुका जिंकलो. यानंतर इथे एक तीन चाकांच्या ऑटोरिक्षाचं सरकार बनलं आहे. या सरकारमधली तिन्ही चाकं वेगवेगळ्या दिशेत चालतात. प्रत्येक विषयात हे सरकार अपयशी ठरलं आहे. महाराष्ट्राच्या सरकारला मी सांगेन की त्यांनी पवित्र जनादेशाचा अपमान करून एक अपवित्र आघाडी करून सत्तेच्या लालसेपोटी इथे सरकार स्थापन झालं आहे’, असंही ते म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादीलाही टोला

‘शिवसेनेच्या मित्रपक्षांना मी सांगेन की तुम्ही तत्वांसाठी राजकारणात आलेले नाही आहात. बाळासाहेब निघून गेले. तुम्ही राजकारणासाठी तत्वांना तोडत मोडत आहात. पण महाराष्ट्राची जनता तुम्हाला ओळखते. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आम्ही ७५ ते ८० टक्के जागा जिंकल्या’, असंही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -