Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश अमित शाह-एकनाथ शिंदे यांची रात्री उशिरा खलबतं, चाळीस मिनिटांच्या भेटीत काय ठरलं?

अमित शाह-एकनाथ शिंदे यांची रात्री उशिरा खलबतं, चाळीस मिनिटांच्या भेटीत काय ठरलं?

Subscribe

नवी दिल्ली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल ४० मिनिटे चर्चा झाली. मात्र, या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे समजू शकलेले नाही. दरम्यान, गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार होते. मात्र, सायंकाळपर्यंत केंद्रातील एकाही नेत्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली नाही. अखेर रात्री अमित शाहांनी त्यांना भेटीसाठी बोलावले.

१३ राज्यातील शिवसेनेच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. यानिमित्ताने दिल्लीतील महाराष्ट्र सदनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी रात्री हा पक्षप्रवेश झाला. त्यानंतर बुधवारी रात्रीच मुख्यमंत्री मुंबईसाठी रवाना होणार होते. मात्र, गुरुवारी अनेक केंद्रीय मंत्र्यांनी भेटीसाठी वेळ दिल्याने त्यांनी दिल्लीतच मुक्काम ठोकला.

- Advertisement -

हेही वाचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार का? शिवसेनेच्या याचिकेवर हायकोर्टात आज सुुनावणी

राज्यातील काही कायदेशीर बाबींसंदर्भात चर्चा करण्याकरता केंद्रीय विधीमंत्री किरण रीजिजू हे एकनाथ शिंदेंना भेटणार होते. मात्र, किरण रीजिजू दिल्लीत उपस्थित नसल्याने एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी फोनवरूनच चर्चा केली. तसंच, केंद्रीय वाहतूक आणि रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी व केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हेसुद्धा एकनाथ शिंदे यांना भेटणार होते. मात्र, त्यांची भेट झाली नाही. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा एकनाथ शिंदे यांची भेट घेणार होते. मात्र, यांचीही भेट होऊ शकली नाही.

- Advertisement -


दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची दिल्लीतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली.

परंतु, एकाही केंद्रीय नेत्याने एकनाथ शिंदेंना भेट दिली नाही. मात्र, रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एकनाथ शिदेंना भेट दिली. या भेटीत त्यांनी जवळपास ४० मिनिटे चर्चा केली. राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध विषयांवर संघर्ष सुरू आहे. या संघर्षावर या दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. परंतु, ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा – जमिनीवरील घडामोडींची ‘यांना’ माहिती नसते, ओवैसींची सरसंघचालक व मुस्लीम नेत्यांवर टीका

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -