मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा आणि मैदानात यावं, अमित शहांचं खुलं आव्हान

महाराष्ट्रात सरकार आहे कुठे, लोक शोधत आहेत. तीन चाकांच्या सरकारची रिक्षा पंक्चर झाली आहे की, रिक्षा धुर सोडतेय. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देऊन मैदानात यावं. असं खुलं आव्हान केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आहेत. तसेच त्यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारला खुलं आव्हान दिलं आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणुका लढवून भाजपशी दोन हात करावेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्व बाजूला ठेवलं. तसेच महाराष्ट्रात सरकार आहे कुठे लोक शोधत आहेत, असा घणाघात अमित शहा यांनी केला आहे.

भाजपची पुन्हा सत्ता आल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार

भाजपची पुन्हा सत्ता आल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असेही सुतोवाच त्यांनी केले आहेत. महाराष्ट्रातील आघाडी सरकार तीन पायांची सरकार असून तिन्ही पक्ष वेगवेगळ्या दिशेने जात आहेत. तसेच रिक्षाची तिन्ही चाकं पंक्चर झाली आहेत. जे चालतच नाहीयेत. रिक्षा फक्त धुर बाहेर काढून प्रदुषण तेवढं वाढवते. मी स्वत: शिवसेनेशी संवाद साधला आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात पुन्हा एकदा निवडणुका लढवल्या जातील आणि मुख्यमंत्री भाजपचाच असेल. असा दावा अमित शहा यांनी केला आहे.

तिन्ही पक्षांनी एकत्र लढायला या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्त्व बाजूला ठेवलं. तुमच्या सभेच्या पाठीमागे जे बॅनर लावले जात होते. त्यामध्ये तुमच्या आणि मोदीजींच्या बॅनरची साईझ बघा. तुमचा बॅनर एक चतुर्थांश इतका होता. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच असं लोकमान्य टिळकांनी सांगितलं होतं. परंतु शिवसेना म्हणते की, शिवसेना हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. त्यामुळे ते मुख्यमंत्री बनले आहेत. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि दोन हात करा. तसेच तिन्ही पक्षांनी एकत्र लढायला या, भाजपाचा कार्यकर्ता त्यासाठी सज्ज आहे. महाराष्ट्राची जनता सुद्दा हिशोब करण्याच्या तयारीत आहे. असं अमित शहा म्हणाले.


हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळाद्वारे प्रशासनाची पायाभरणी केली – अमित शहा