Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी अमित शाह मुंबईत तर चंद्रकांत पाटील कोल्हापुरात, 'त्या' वक्तव्यावरून नाराजी?

अमित शाह मुंबईत तर चंद्रकांत पाटील कोल्हापुरात, ‘त्या’ वक्तव्यावरून नाराजी?

Subscribe

काही दिवसांपूर्वी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद विद्ध्वंसाप्रकरणी केलेल्या वक्तव्यावरून चांगलाच वाद रंगला होता. या वक्तव्यानंतर शिंदे गटातील आमदारांकडून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील चंद्रकांत पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, अमित शाह यांचा आज मुंबई दौरा आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला अमित शाह हे उपस्थिती लावणार आहेत. परंतु चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे अमित शाहांची नाराजी चंद्रकांत पाटील यांच्यावर अजूनही कायम आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चंद्रकात पाटील यांनी बाबरी मशीद विद्ध्वंसाप्रकरणी वक्तव्य केलं होतं. यावेळी बाबरी मशिद पाडण्यात शिवसैनिक नव्हते, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. परंतु त्यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गटासह ठाकरे गटाच्या आमदारांकडून जोरदार टीका झाली. पाटलांनी हे वक्तव्य करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला, असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केला.

- Advertisement -

दरम्यान, या वादानंतर चंद्रकांत पाटलांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजपचे काही नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. भाजप नेते आशिष शेलार यांनी अमित शाह यांच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी ते वक्तव्य टाळायला हवं होतं, असं म्हटलं होतं. तर चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याशी मी सहमत नाही, असं उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले होते. परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा हा परिणाम म्हणायचा का?, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

अमित शाह आजपासून दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर येत आहेत. आज संध्याकाळी सात वाजता मुंबई विमानतळावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं भव्य स्वागत होणार आहे. त्यानंतर उद्या म्हणजेच १६ एप्रिल रोजी नवी मुंबईत त्यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा : मोदी सरकारच्या चुकीमुळे ‘पुलवामा हल्ला’; सत्यपाल मलिकांचं खळबळजनक वक्तव्य


 

- Advertisment -