गुजरातमध्ये जाणता राजा नाटकावेळी…, पुण्यातील दौऱ्यात अमित शाह आठवणीत रमले

Amit Shah in Pune Visit | छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाची माहिती देणारे हे शिवसृष्टीचं काम म्हणजे इश्वरी काम आहे. हे काम जलग गतीने होईलच. हे काम कोणीच रोखू शकत नाही, असंही अमित शाह म्हणाले.

amit shah

Amit Shah in Pune Visit | पुणे – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) गेल्या दोन दिवसांपासून पुणे दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी मोदी अॅट ट्वेन्टी या पुस्तकाचे प्रकाशन केले. तर, आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचीही आठवण काढत त्यांच्या जाणता राजा नाटकाची आठवण त्यांनी शेअर केली.

अमित शाह म्हणाले की, गुजरातमध्ये नरेंद्र मोदींनी जाणता राजा नाटकाचे आठ जिल्ह्यांत प्रयोग दाखवले होते. त्यावेळी गुजरातचे लोक नाटक बघायला यायचे आणि शिवाजी महाराजांचे भक्त होऊन जायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आजही काश्मीर ते कन्याकुमारी आणि द्वारका ते कलकत्तामधील लोकांना प्रेरित करतं.

हेही वाचा – संजय राऊत यांच्या टिप्पणीवरून आशीष शेलारांना लोकमान्य टिळकांच्या अग्रलेखाचे स्मरण

शिवसृष्टीचा पहिल्या टप्प्याचं आज उद्घाटन होतंय. त्याचा पहिला टप्पा मी पाहिला आहे. ६० कोटींचा खर्च यासाठी करण्यात आलाय. येथे येणारा प्रत्येक माणूस शिवरायांबद्दल संपूर्ण माहिती घेऊन जाईल, यात काही शंका नाही, असंही शाह म्हणाले. ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाची माहिती देणारे हे शिवसृष्टीचं काम म्हणजे इश्वरी काम आहे. हे काम जलग गतीने होईलच. हे काम कोणीच रोखू शकत नाही.

यावेळी त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्याही उल्लेख करत त्यांचा गौरव केला. बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांचं संपूर्ण जीवन शिवाजी महाराजांसाठी समर्पित केलं. जगभरातील दस्तावेज एकत्र आणत त्यांनी इतिहासाचं संवर्धन केलं, असंही अमित शाह म्हणाले.

हेही वाचा …हे खूप काही सांगून जाणारं आहे, पुणे दौऱ्यावरून रोहित पवारांचा अमित शाहांना टोला