घरताज्या घडामोडीमहापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने कसली कंबर, आजपासून अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर

महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने कसली कंबर, आजपासून अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर

Subscribe

पुण्यातील पोट निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आता आगामी महापालिकाच्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे दौऱ्यात वाढ झाली आहे. काहीच दिवसापूर्वी नरेंद्र मोदींनी मुंबईचा दौरा केला होता. त्यानंतर आता अमित शाह पुढील दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहे. त्यांच्याहस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन होणार आहे.

कसा असेल अमित शाह यांचा दौरा?

- Advertisement -

– डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दीक्षाभूमीवर अभिवादन (सकाळी-१०.३० वाजता, नागपूर)

– डॉ.हेडगेवार आणि श्री गुरुजींच्या समाधीवर पुष्पहार अर्पण (सकाळी- ११ वाजता, नागपूर)

- Advertisement -

– दैनिक सकाळ आयोजित सहकार परिषद

– जम्मू काश्मीरमध्ये शहीद सैनिकांच्या मुलांशी संवाद (संध्याकाळी ५ वाजता, पुणे)

– मोदी @20 पुस्तकाचे उद्घाटन (संध्याकाळी ७.३० वाजता, पुणे)

– ऑंकारेश्वर मंदिरात दर्शन व पूजा (रात्री ९ वाजता, पुणे)

दरम्यान, मुंबई महापालिकेत मागील २५ ते ३० वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. परंतु मुंबई महापालिकेवर भाजप आपला झेंडा फडकावण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता भाजप शिवसेनेला टक्कर देणार की नाही, किंवा भाजपची पुढील रणनिती काय असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : ठाकरे म्हणजे शिवसेना…; मग राज आणि जयदेव ठाकरेंची का नाही?, संजय शिरसाटांचा सवाल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -