घरमहाराष्ट्रAmit Shah in Nanded : धोकेबाजीचे काम उद्धव ठाकरेंनी केले - अमित...

Amit Shah in Nanded : धोकेबाजीचे काम उद्धव ठाकरेंनी केले – अमित शाह

Subscribe

मनमोहन सिंह आणि सोनिया गांधी यांच्या दहा वर्षांच्या शासनकाळात भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होत होते. २०१४ पासून मोदींचे सरकार आहे. आमचे विरोधकही मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करु शकलेले नाहीत. मोदींच्या ९ वर्षांच्या सत्ताकाळात प्रत्येकाला शौचालय, वीज, पिण्याचे पाणी, गरीबांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्याच्या सुविधा मोफत देण्यात आल्या आहेत.

नांदेड – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेडमधील सभेत मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कामाचा उल्लेख करत मनमोहनसिंग-सोनिया गांधी यांच्या नेतृत्वातील युपीए सरकारच्या काळातील सरकारवर टीका केली. राहुल गांधी यांच्या चार पिढ्यांनी या देशावर राज्य केले मात्र गरीबांना घर आणि शौचालय ते देऊ शकले नाही. हे सर्व मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या काळात गरीबांना मिळालं आहे, असा दावा शाहांनी यावेळी केला. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी यावेळी निशाणा साधला. शिवसेना कोणीही फोडली नाही, तर ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्यामुळे खऱ्या शिवसैनिकांनी त्यांची साथ सोडली, अशी टीका त्यांनी ठाकरेंवर केली.

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. नांदेडमध्ये मी प्रतापराव चिखलीकर यांच्या निमंत्रणावरुन आलो आहे, असे सांगत अमित शाह यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचीच तयारी नांदेडमधून जाहीर केली आहे. शाहांनी शिवसेना ही एकनाथ शिंदेंना मिळाली आहे असे सांगत उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नसल्याची पुन्हा एकदा टीका केली.

- Advertisement -
नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा येथे अमित शाहांचे स्वागत
नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा येथे अमित शाहांचे स्वागत

मनमोहन सिंह आणि सोनिया गांधी यांच्या दहा वर्षांच्या शासनकाळात भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होत होते. २०१४ पासून मोदींचे सरकार आहे. आमचे विरोधकही मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करु शकलेले नाहीत. मोदींच्या ९ वर्षांच्या सत्ताकाळात प्रत्येकाला शौचालय, वीज, पिण्याचे पाणी, गरीबांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्याच्या सुविधा मोफत देण्यात आल्या आहेत.

राहुल गांधी यांनी उत्तर द्यावे की तुमच्या चार पिढ्यांनी गरीबांना घर, शौचालय, अन्नधान्य देऊ शकले नाही तर तुम्ही चार पिढ्या काय केले? असा सवाल काँग्रेसला केला आहे.
मोदींच्या नऊ वर्षांच्या काळात गरीबांना घर, शौचालय, वीज, पाणी, मोफत राशन देण्याचे काम केले असल्याचा दावा अमित शाह यांनी नांदेडमधील सभेत केला. मोदी सरकारच्या ९ वर्षाच्या काळातील कामांचा आढावा यावेळी शाहांनी घेतला.

- Advertisement -

हेही वाचा : अशोकरावांची मजल २जी, ३जी आणि सोनियाजींपर्यंतच; फडणवीसांचा चव्हाणांवर हल्लाबोल

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी शनिवारी सकाळी माध्यमांसोबत बोलताना आरोप केला होता, की शिवसेना फोडण्याचे काम अमित शाहांनी केले आहे. एकनाथ शिंदे यांच्यामध्ये शिवसेना फोडण्याची ताकद नव्हती. त्यांच्यामागे फक्त ४ ते ५ आमदार होते. अमित शाह यांनीच शिवसेना फोडली. आता आम्ही भाजप संपवल्याशिवाय राहाणार नाही. खासदार राऊत यांच्या या आरोपांचा समाचार केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी त्यांच्या भाषणात घेतला.

उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षासोबत विधानसभेची निवडणुक लढवली आणि जिंकली. जेव्हा सरकार बनवण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी धोकेबाजी केली असा आरोप अमित शाहांनी ठाकरेंवर केला. उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले. खऱ्या शिवसैनिकांना राष्ट्रवादीसोबतची साथ नको होती, म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत युती केली आहे. आम्ही शिवसेना फोडली नसल्याचाही दावा, शाहांनी यावेळी केला.

मोदींच्या ९ वर्षांचा लेखाजोखा मांडताना शाह म्हणाले, मोदींच्या काळात राम मंदिर होत आहे. काश्मीरमधून ३७० कलम हटवले गेले. तीन तलाक बंद करण्यात आला. या सर्व निर्णयांवर उद्धव ठाकरे यांची काय भूमिका आहे, असाही सवाल शाहांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -