बारामतीत मोदींऐवजी १९ एप्रिलला अमित शहांची सभा

भाजपचे अध्यक्ष अमित शहांच्या सभेनंतर त्याच दिवशी १९ एप्रिलला खडकवासला येथे प्रचार सभा होणार आहे. त्यानंतर २१ तारखेला भोर व्हेला येथे नितीन गडकरी यांची सभा होणार आहे.

congress moves sc against pm narendra modi amit shah over poll code violation

बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपली सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपने दौंडचे आमदार राहुल कुल यांची पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. तिच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार होती. मात्र आता बारामतीमध्ये मोदींची सभा होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. नरेंद्र मोदींऐवजी भाजपचे अध्यक्ष अमित शहा बारामतीमध्ये सभा घेणार आहेत.

बारामतीमध्ये येत्या १९ एप्रिलला भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची सभा होणार आहे. ऐवढेच नाही तर पवारांचा गड काबीज करण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहांच्या सभेनंतर त्याच दिवशी १९ एप्रिलला खडकवासला येथे प्रचार सभा होणार आहे. त्यानंतर २१ तारखेला भोर व्हेला येथे नितीन गडकरी यांची सभा होणार आहे. तर हिंजवडीमध्ये स्मृती इराणी यांची देखील सभा होणार आहे.