अमित ठाकरेंचा ७ दिवस कोकण दौरा

Amit Thackeray

राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसेचे युवा नेते अमित ठाकरे पुढील ७ दिवस कोकण दौऱ्यावर असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील सत्तेची उलथापालथ झाल्यानंतर आता अमित ठाकरे हे कोकण दौऱ्यावरती जाणार आहे. ५ जुलै ते ११ जुलैपर्यंत अमित ठाकरेंचा कोकण दौरा असणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर १ जून रोजी शस्त्रक्रिया पार पडणार होती. त्यामुळे त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. कारण शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर एक महिन्यासाठी राज ठाकरे आणि मनसे पदाधिकाऱ्यांचा संपर्क होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी अमित ठाकरेंवर महत्त्चाची जबाबदारी दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता अमित ठाकरे हे सात दिवसांसाठी कोकण दौऱ्यावरती असणार असून येथील पावासामुळे आणि वादामुळे होणारे नुकसान लक्षात घेता, यासंदर्भातील आढावा घेण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी २७ जून रोजी मनविसेचे उपाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य तसंच मुंबईतील काही विधानसभा मतदासंघांतील मनविसेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.


हेही वाचा : …आणि फडणवीस ढसा ढसा रडले, पक्षाचा आदेश मानत उपमुख्यमंत्री बनले