बिग बींचे नाव, आवाज, इमेज वापरणाऱ्यांची खैर नाही, कोर्टाने दिला मोठा निर्णय

amitabh bachchan plea against advertisement companies using his name personality and voice without his permission

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे नाव, आवाज आणि इमेज वापरणाऱ्यांची आता खैर नाही. कारण अमिताभ बच्चन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे असून त्यात त्यांच्या परवानगीशिवाय काही कंपन्या त्यांचे नाव, आवाज आणि इमेज वापरत असल्याचा आरोप केला आहे. या घटना वारंवार घडत आहे. त्यामुळे अमिताभ आपल्या पब्लिसिटी आणि पर्सनॅलिटी राइट्सची मागणी करत आहेत. यातून आता अमिताभ बच्चन यांना दिलासा मिळाला आहे. न्यायमूर्ती चावला यांनी प्राधिकरण आणि दूरसंचार विभागाला जे अमिताभ बच्चन यांचे पब्लिकली उपलब्ध असलेले नाव, फोटो आणि पर्सनॅलिटी ट्रेंट्स तात्काळ काढून टाकण्याचे आदेश जारी केले आहेत.

याशिवाय कोर्टाने टेलीकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्सला बच्चन यांच्या नावाचा आणि आवाजाचा बेकायदेशीर वापर करणाऱ्या फोन नंबरची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्सना बच्चन यांचे व्यक्तीमत्त्व खराब करणाऱ्या ऑनलाइन लिंक्स काढून टाकण्यासही सांगण्यात आले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

काही कंपन्या अमिताभ बच्चन यांचे नाव, आवाज आणि व्यक्तिमत्त्वाचा चुकीच्या पद्धतीने वापर करत आहेत. या प्रकरणी बिग बींनी हायकोर्टात याचिका दाखल केली. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अमिताभ बच्चन यांच्या नावाने एक लॉटरीची जाहिरात फिरत आहे, ज्यात प्रमोशनल बॅनरवर बिग बींचा फोटो झळकतोय. याशिवाय त्यावर KBC चा लोगोही आहे. हे बॅनर लोकांची दिशाभूल करण्यासाठी कोणीतरी तयार केले आहे. यात अजिबात तथ्य नाही.

याप्रकरणी अमिताभ बच्चन यांच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी याचिका दाखल केली. यावर न्यायमूर्ती चावला यांना सांगितले की, माझ्या अशिलाच्या व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचे उल्लंघन केले जात आहे. कोणत्याही जाहिरातीत आपले नाव, आवाज आणि व्यक्तिमत्त्व वापरले जाऊ नये, अशी त्याची इच्छा आहे. त्यामुळे त्यांची प्रतिमा खराब होत आहे.

अमिताभ बच्चन हे एक मोठे सेलिब्रिटी आहेत. अशा परिस्थितीत त्यांचे नाव कोणत्याही प्रकारच्या प्रचारात वापरता येणार नाही. अभिनेत्याने जाहिरात कंपन्यांवर प्रसिद्धीच्या अधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. अमिताभ बच्चन यांच्या वकिलानेही न्यायालयाला सांगितले की, अभिनेता हे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे. अशाप्रकारच्या जाहिरातींमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व करणे, तेही त्यांच्या परवानगीशिवाय, हे चुकीचे आहे. जाहिरात कंपन्यांना अमिताभ बच्चन यांचे नाव आणि आवाज वापरायचा असेल तर ते अभिनेत्याच्या परवानगीनेच करू शकतात. अन्यथा अमिताभ बच्चन यांचे नाव कोणत्याही प्रकारच्या सेवेत वापरले जाऊ नये.

अभिनेत्याचे नाव, दर्जा आणि व्यक्तिमत्त्वाचा वापर ज्या काही कंपन्या आता करत आहेत, त्यांना आता अभिनेत्याची परवानगी घ्यावी लागेल, याशिवाय असे करता येणार नाही. कोणताही कलाकार त्याची प्रतिमा किंवा प्रतिष्ठा खराब करु इच्छित नाही. यात बिंग बींच्या बाबतीत अशा काही घटना घडल्या ज्यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला आहे.


अरे एकनाथ शिंदे 40 दिवस जेल भोगून आलाय; महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मुख्यमंत्र्यांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर