घरमहाराष्ट्रखिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल किर्तीकरांची आर्थिक गुन्हे शाखेकडून तब्बल सहा तास चौकशी

खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल किर्तीकरांची आर्थिक गुन्हे शाखेकडून तब्बल सहा तास चौकशी

Subscribe

मुंबई : कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. यानंतर कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केल्यानंतर आज त्यांची तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली आहे. अमोल किर्तीकर हे ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय मानले जातात. आर्थिक गुन्हे शाखेकडून अमोल किर्तीकर यांच्यासह अनेक जणांवर गुन्हा दाखल केल आहे.

मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आर्थिक गुन्हे शाखेने संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, सुनिल बाळा कदम, नियोजन, तत्कालीन सहआयुक्त, बीएमसी, सह्याद्री रिफ्रेशमेंट राजीव साळुंखे, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागीदार, कर्मचारी आणि स्नेहा कॅटरर्स, बीएमसीचे अधिकारी आणि इतर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – महिला आरक्षण विधेयकाला पाठींबा, पण…. सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडली स्पष्ट भूमिका

ठाकरे गटाच्या निकटवर्तीय अडचणीत

ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले खासदार गजानन किर्तीकर यांचे सुपुत्र अमोल किर्तीकर आहेत. कथित बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी किशोरी पेडणेकर, ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांना जोगेश्वरीतील भूखंड आणि पंचतारांकित हॉटले प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रविंद्र वायकर यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल केला आहे. यात रविंद्र वायकर आणि त्यांच्या पत्नीसह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे बड्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांच्या चौकशी सुरू आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘या’ घोटाळ्या प्रकरणी किशोरी पेडणेकरांवर मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

नेमका काय आहे खिचडी घोटाळा

मुंबई महानगरपालिकेच्या 100 कोटींचा हा खिचडी घोटाळा आहे. लॉकडाऊन काळात गरीब मायग्रेन कामगारांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यासाठी खिचडी देण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. या मायग्रेन कामगारांना खिचडी देण्याचे कॉन्ट्रॅक्ट 52 कंपन्यांना बीएमसीने दिले होते. यात सुरुवातीच्या 4 महिन्यात 4 कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आल्याचा दावा बीएमसीने केला. पण, बीएमसीमध्ये खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप केला. यानंतर बीएमसीची चौकशी सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -