पुणे : महाविकास आघाडी आणि इंडिया म्हणून निवडणुकीला समोरे जाणार आहे. सत्ताधारी पक्षामध्ये भीतीचे वातावरण आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष निवडणूक लढवणार आहे, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हेंनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चेवर दिली आहे.
अमोल कोल्हे म्हणाले, “आजच्या बैठकीत महाविकास आघाडी आणि इंडिया म्हणून ठामपणे निवडणुकीला समोरे जायाचे आहे. मुळात सत्ताधारी पक्षामध्ये जे भीतीचे वातावरण आहे. एका बाजुला भाजपा जर 400 पार करणार असा दावा केला जात आहे तर, दुसऱ्या बाजुला बिहार, झारखंड आणि नुकतेच महाराष्ट्रात जे घडले. जर अब की बार 400 पार म्हणत आहेत तर, या पद्धतीने पक्ष फोडण्याची, मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्याची आणि काही पक्ष पळवण्याची गरज का पडली असती? ही साधी सरळ गोष्ट जनतेला माहिती आहे आणि हे जनतेपर्यंत पोहोचवणे ही आमची जबाबदारी आहे.
हेही वाचा – Hindu Temple : मुस्लीम देशात आणखी एक हिंदू मंदिर; अबुधाबीनंतर ‘या’ ठिकाणी बांधले जाणार
बैठकीत चिन्हाबाबत काही चर्चा झाली का? यावर अमोल कोल्हे म्हणाले, “शरद पवार गटातील पक्षाचे नाव आणि चिन्हे ही दोन्ही घेऊन लवकरच जनतेपर्यंत आम्ही पोहचवू. त्यासाठी आमचा पक्ष विलीन करण्याबाबत कोणताही चर्चा झालेल्या नाहीत”, अशी माहिती अमोल कोल्हे म्हणाले.
हेही वाचा – Rajya Sabha : याचसाठी केला होता अट्टाहास, मिलिंद देवरा आता राज्यसभेवर
शरद पवारांचा दरारा
शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये जाण्याच्या बातम्या का पेरल्या जात आहे का?यावर अमोल कोल्हे म्हणाले, “हे आम्हाला माहीत नाही. जर या बातम्या पेरल्या जात आहे म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वाचा दरारा आणि त्यांची जनमानसात असलेली प्रतिमा या दोन्ही गोष्टी पुन्हा एकदा अधोरेखित होतात.”