घरमहाराष्ट्रपुणेLok Sabha 2024: साहेब, 5 वर्षे कुठे होतात? शिरुरमध्ये अमोल कोल्हेंविरोधात बॅनर

Lok Sabha 2024: साहेब, 5 वर्षे कुठे होतात? शिरुरमध्ये अमोल कोल्हेंविरोधात बॅनर

Subscribe

शिरुर: लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून प्रत्येक पक्षाने प्रचाराला वेग दिला आहे. पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारांची घोषणा जवळपास झाली आहे. या प्रचारांदरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशातच आता जनताही जागरूक झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. (Amol Kolhe constituency shirur assembly constituency Lok Sabha 2024 Sir where is 5 years Banner against Amol Kolhe in Shirur)

शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात त्यांच्या मतदार संघात बॅनर झळकले आहेत. आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात बॅनरच्या माध्यमातून अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारण्यात आले आहेत. शिरुरमध्ये लागलेल्या या बोलक्या बॅनरची आता सर्वत्र चर्चा आहे.

- Advertisement -

मतदारांनी व्यक्त केली नाराजी ( Banner Against Amol Kolhe)

मागच्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली शिरूर लोकसभा मतदारसंघात आता राजकीय घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील तर महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे निवडणुकीत पुन्हा आमनेसामने आहेत. दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचाराची सुरूवात केली आहे. परंतु मागच्या पाच वर्षांत अमोल कोल्हे मतदारसंघात फिरकले नाहीत, अन् आता प्रचारासाठी मतदारसंघात येत आहेत, अशी नाराजी काही सुज्ञ नारगिकांनी बोलून दाखवली आहे.

(हेही वाचा: Politics: हिंमत असेल तर कदमांना जेलमध्ये टाका; परबांचं किरीट सोमय्यांना खुलं आव्हान)

- Advertisement -

बॅनरमध्ये काय?

शिरुर मतदार संघात अमोल कोल्हे यांनी दौरा केला. यावेळी परिसरात अमोल कोल्हे यांच्या विरोधात बोलके पोस्टर लागलेले पाहायला मिळाले. त्यात विद्यमान खासदार साहेब पाच वर्षे तुम्ही कुठे होता? कोरोनासारख्या भयंकर परिस्थितीमध्ये तुम्ही मतदारसंघांमध्ये का नव्हता? पाच वर्षे मतदारसंघात नाही पण प्रचारासाठी तुम्हाला वेळ कसा मिळाला? असे तीन प्रश्न बॅनरद्वारे विचारण्यात आले आहेत.

(हेही वाचा: Lok Sabha 2024 : भाजपा कोणत्या तोंडाने ही बाब नाकारणार? रोहित पवारांचा थेट सवाल )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -