घरताज्या घडामोडीअमोल कोल्हेंनी उडवली भाजपच्या खासदाराची खिल्ली, कोल्हेंचं ते ट्ववीट चर्चेत

अमोल कोल्हेंनी उडवली भाजपच्या खासदाराची खिल्ली, कोल्हेंचं ते ट्ववीट चर्चेत

Subscribe

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी एक ट्वीट करत एका भाजपच्या खासदाराची खिल्ली उडवली आहे. तसेच त्यांचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अमोल कोल्हे यांनी विमानप्रवास करतानाचा फोटो टाकला आहे. अमोल कोल्हे हे इंडिगो एअरलाईन्सच्या विमानातून प्रवास करत असतानाचा हा फोटो आहे. या फोटोसोबत कोल्हे यांनी लिहिलेल्या कॅप्शनचा मजकूर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

अमोल कोल्हेंचं ट्वीट काय?

- Advertisement -

बसल्या बसल्या वाटून गेलं… विमानात खासदार इमर्जन्सी एक्झिटजवळ बसले की विमान कर्मचाऱ्यांना टेन्शन येत असेल का? LOL.टीप – मागे जरा ‘तेजस्वी सूर्य’असल्याने फोटो चांगला आला नाही’, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

या ट्विटचा अर्थ सुरूवातीला लागत नव्हता. परंतु काही वेळानंतर या ट्वीटचा अर्थ समजला. डिसेंबर महिन्यात भाजप खासदार तेजस्वी सूर्या हे इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करत होते. हे विमान चेन्नईवरुन त्रिवेंद्रमला जात होते. त्यावेळी तेजस्वी सूर्या हे विमानातील एक्झिट डोरच्या बाजूच्या आसनावर बसले होते. त्यानंतर विमान सुटायला अवघी काही मिनिटं शिल्लक असताना तेजस्वी सूर्या यांनी यांनी अचानक इमर्जन्सी एक्झिटचा दरवाजा उघडला होता. त्यामुळे विमानातील कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली होती. त्यावरून अमोल कोल्हेंनी हे ट्वीट करत तेजस्वी सूर्या यांची खिल्ली उडवली आहे.


हेही वाचा : मातीचा सुगंध असलेले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -