घरमहाराष्ट्रआयुष्य, करिअर, राजकारण...; अमोल कोल्हेंचं 'चक्र' कोणत्या दिशेने फिरणार?

आयुष्य, करिअर, राजकारण…; अमोल कोल्हेंचं ‘चक्र’ कोणत्या दिशेने फिरणार?

Subscribe

Amol Kolhe Instagram Post | या व्हिडीओमध्ये वेगाने फिरणारे गोलाकार खेळणे आहे. त्या खेळण्याचं उदाहरण देत त्यांनी आयुष्य, करिअर, राजकारणाच्या दिशेबाबत भाष्य केलं आहे.

Amol Kolhe Instagram Post | पुणे – शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रावीद काँग्रेसचे खासदार (NCP MP) अमोल कोल्हे (Amol Kolhe) पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. शिवाय, भाजपाच्या नेत्यांच्या गाठी-भेटी, महाविकास आघाडीने बहिष्कार टाकलेल्या बैठकांना हजर राहणे आदी विविध भूमिकांमुळे अमोल कोल्हे राष्ट्रवादीला रामराम ठोकणार असल्याची कुजबूज सुरू आहे. याबाबत त्यांनी अनेकदा स्पष्टीकरणही दिलं आहे. पण आज त्यांच्या एका इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे (Instagram Post ) पुन्हा एकदा राजकीय संशय निर्माण होत आहे.

हेही वाचा – “भाजपची घरं कशी फुटतात हे आता कळेल!”; नाना पटोलेंचा इशारा

- Advertisement -

‘जोपर्यंत गती आहे तोपर्यंत चक्र एकाच दिशेने भासतात, पण गती कमी होताच कळतं दिशाच वेगळ्या आहेत. याला निसर्गाचा नियम म्हणायचं की सगळीकडेच असं असतं? आयुष्य, करिअर, राजकारण…गती कमी झाल्यानंतर दिशा कळते,’ असे कॅप्शन देत अमोल कोल्हे यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये वेगाने फिरणारे गोलाकार खेळणे आहे. त्या खेळण्याचं उदाहरण देत त्यांनी आयुष्य, करिअर, राजकारणाच्या दिशेबाबत भाष्य केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)


गेल्या काही दिवसांपासून अमोल कोल्हे यांची भाजपाच्या नेत्यांसोबत जवळीकी वाढली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यातच त्यांचा आजचा दिशेबाबतचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.

- Advertisement -


शिवप्रताप गरुडझेपच्या निमित्ताने त्यांनी अमित शाहांची भेट घेतली होती. तर, महाराष्ट्रातही भाजपाच्या नेत्यांसोबत अनेकवेळा त्यांनी गुप्त भेटी घेतल्या आहेत. तसंच, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी झालेल्या खासदारांच्या बैठकीला महाविकास आघाडीतील खासदारांनी बहिष्कार टाकला होता. मात्र, या बैठकीला अमोल कोल्हे उपस्थित होते.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -