घरमहाराष्ट्रपुणेअमोल कोल्हेंचा पोलिसांवर गंभीर आरोप, 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे प्रयोग बंद पाडण्याची धमकी

अमोल कोल्हेंचा पोलिसांवर गंभीर आरोप, ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे प्रयोग बंद पाडण्याची धमकी

Subscribe

पुण्यातील पिंपरीमध्ये खासदार आणि अभिनेते असलेले अमोल कोल्हे यांच्या 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचे प्रयोग सादर करण्यात येत आहेत. पण या नाट्याचे फ्री पासेस न मिळाल्याने पिंपरी पोलिसांनी हे महानाट्य बंद पाडण्याची धमकी दिली असल्याचा गंभीर आरोप डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून करण्यात आला आहे.

Amol Kolhe serious accusation against Police : राज्यात आज छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. याच निमित्ताने पुण्यातील पिंपरीमध्ये खासदार आणि अभिनेते असलेले अमोल कोल्हे यांच्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे प्रयोग सादर करण्यात येत आहेत. पण या नाट्याचे फ्री पासेस न मिळाल्याने पिंपरी पोलिसांनी हे महानाट्य बंद पाडण्याची धमकी दिली असल्याचा गंभीर आरोप डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून करण्यात आला आहे. (Amol Kolhe serious accusation against police, threatening to stop Drama of ‘Shivaputra Sambhaji’) नाटकाचे पास दिले नाही कर सादरीकरण कसे होते, ते पाहतो, अशी धमकी दिल्याचे कोल्हे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तर याबाबतची दखल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांनी घ्यावी, अशी विनंती अमोल कोल्हे यांच्याकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा – ‘मोचा’मुळे देशातील काही भागांमध्ये आज उष्णतेच्या लाटेसह पावसाचा अंदाज

- Advertisement -

अभिनेते अमोल कोल्हे यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या या घटनेची माहिती देताना सांगितले की, “जर एखादा पोलीस बांधव मोफत पास मिळावा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कसा सादर होतो हे बघतो, अशी धमकी देत असेल तर माननीय गृहमंत्री महोदयांनी त्यांना समज द्यावी. अंगावर आलेली वर्दी ही केवळ अधिकाराची नाही, ती त्याहीपेक्षा जास्त जबाबदारीची आहे, याचं त्यांनी भान ठेवावं अशी माझी हात जोडून विनंती आहे. तर तिकीट काढून आलेल्या प्रत्येक पालकासाठी आणि प्रत्येक व्यक्तीसाठी मी मानाचा मुजरा करतो.”\

- Advertisement -

जर फ्री पास हवा असेल तर कृपया एकदा या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात धावून दाखवा. 4 ते 5 एन्ट्री ज्या खालून वर, वरुन खाली करायच्या असतात, त्या 20 सेकंदांत एन्ट्री घेऊन दाखवा. सादरीकरणासाठी अनेक जण परिश्रम घेतात. यामागे प्रचंड मेहनत आहे, परिश्रम आहे, या परिश्रमांचा एकदा विचार करा, असे म्हणत अमोल कोल्हे यांनी आपला राग व्यक्त केला आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हॉटेलमध्ये गेलात तर जेवणाचं बिल माफ करा म्हणत नाही, ढाब्यावर, पिकनिकला गेलात तर तिथलं बिल माफ करा म्हणत नाही. इथे मी केवळ फक्त आणि फक्त शिवशंभू म्हणून सादरीकरण करतो, ना कुठला प्रोटोकॉल असतो, ना कुठली सिक्युरिटी असते, इतकंच कशाला तर तुमच्या खाकी वर्दीचा मला प्रचंड अभिमान आहे, मला प्रचंड आदर आहे म्हणून मी पर्सनल पोलीस सिक्युरिटी गार्डसुद्धा घेत नाही आणि आज तुमच्यामुळेच मला इथे येऊन बोलावं लागलं, याचं मनापासून खरंच वाईट वाटल्याचं अमोल कोल्हे यांनी महानाट्याच्या प्रयोगानंतर वारंवार बोलून दाखवले आहे.

तसेच, कृपया मोफत पास मागू नका. पास दिला नाही तर नाटक कसं सुरू राहिल बघतो अशी धमकी महाराष्ट्राच्या मातीत एका पोलीस बांधवाने देणं दुर्दैवी आहे आणि याची दखल माननीय गृहमंत्र्यांनी जरुर घ्यावी, अशी विनंती देखील अमोल कोल्हे यांच्याकडून करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -