घरमहाराष्ट्रAmol Kolhe : ...अशा सूचना कोणाकडून दिल्या जातात? 'तो' धक्कादायक अनुभव कथन...

Amol Kolhe : …अशा सूचना कोणाकडून दिल्या जातात? ‘तो’ धक्कादायक अनुभव कथन करताना अमोल कोल्हेंचा सवाल

Subscribe

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुंबईतील वाहतूक पोलिसांच्या वसुलीचा एका धक्कादायक अनुभव शेअर केला करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबई: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुंबईतील वाहतूक पोलिसांच्या वसुलीचा एका धक्कादायक अनुभव शेअर केला करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईमधील वाहतूक पोलिसांना वसूलीचे टार्गेट देण्यात आले आहे. प्रत्येक चौकात 25 हजारांची वसूली आणि 20 वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचा खळबळजनक दावा अमोल कोल्हें यांनी केला आहे. (Amol Kolhe such instructions are given by whom Amol Kolhe NCP question while narrating that shocking experience)

अमोल कोल्हें यांनी ट्वीट करत म्हटले की, आजचा धक्कादायक अनुभव!… मुंबईत सिग्नलवर वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाइन दंड भरण्यास सांगितले. मी स्वत: काय प्रकार आहे याची माहिती घेतली. त्या भगिनीने थेट मोबाईलवरील मेसेज दाखवला. प्रत्येक चौकात 25 हजार रुपयांची वसुली व 20 वाहनांवर कारवाई झाली पाहिजे, असे आदेश असल्याचे सांगितले. तो मेसेज पाहून मला धक्काच बसला. मुंबईत 652 ट्रॅफिक जंक्शन आहेत. 25000*652= 1,63,00,000 प्रति दिन म्हणजे, फक्त एकट्या मुंबईत तब्बल 1.63 कोटी रुपये जमा होतात. इतर शहरांचं काय? त्यामुळे संबंधित मंत्रीमहोदयांनी आणि अधिकाऱ्यांनी खुलासा केल्यास, वाहतूक शाखेचा उपयोग वाहतूक नियमनापेक्षा वसुलीसाठी होतोय का? याची जनतेला माहिती मिळेल. शेवटी ट्रिपल इंजिन. ट्रिपल वसुली, असा टोलाही कोल्हे यांनी लगावला.

- Advertisement -

वसुली कोणाच्या सांगण्यावरून

दिलेली वसुली केल्याशिवाय जागा सोडायची नाही, अशा आम्हाला सूचना असल्याची हकीकत महिला वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी आपल्याकडे मांडली आहे. त्यामुळे अशाप्रकारे आदेश नेमकं कोणाकडून दिले जातात, याबाबत जाणून घेण्याची मला आणि जनतेला उत्सुकता असून, संबंधित मंत्री महोदयांनी यावर प्रकाश टाकावा, असंही कोल्हे म्हणाले.

- Advertisement -

(हेही वाचा: Sharad Pawar : निवडणुका झाल्यानंतर एक नवी फळी दिसेल; आमदार बैठकीत शरद पवाराचं वक्तव्य )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -