घरमहाराष्ट्रभाजपने जाणीवपूर्वक मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा मोठा दाखवला, अमोल मिटकरींचा आरोप

भाजपने जाणीवपूर्वक मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा मोठा दाखवला, अमोल मिटकरींचा आरोप

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीफ्लेक्सवर पांडुरंगापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो मोठा दाखवण्यावर तीव्र अक्षेप घेतला आहे. पिंपरी चिंचवड येथे भाजपाने जाणीवपूर्वक मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा जाणीवपूर्वक मोठा दाखवून वारकरी संप्रदायाचा अवमान केल्याचा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी मोदींच्या तुकोबारायांच्या वेशातील फोटोवरही आक्षेप घेतला. यामागे भाजपची आध्यत्मिक आघाडी असल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

तुकोबारायांचा फार मोठा अपमान –

- Advertisement -

भाजपने आज नाटक सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो जगदगुरू संत तुकोबारायांच्या वेशात दाखवण्यात येत आहे. त्यातून तुकोबारायांचा फार मोठा अपमान केला आहे. दुसरीकडे ज्या पांडुरंगाला आमच्या संतांनी सर्वस्व मानले त्या पांडुरंगाची प्रतिमा मोदींपुढे लहान करण्यात आली. यामागे भाजपाच्या आध्यात्मिक विकास आघाडीचा मेंदू आहे. भाजपाकडून वारंवार अशा पद्धतीने समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचे पाप होत आहे, असे मत अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले.

वारकरी संप्रदायाची आपमान –

- Advertisement -

हा वारकरी संप्रदायाचा अपमान आहे. नरेंद्र मोदी निश्चित मोठे आहेत, पण ते पांडुरंगापेक्षा मोठे असू शकत नाहीत, असा  माझा वारकरी म्हणून विश्वास आहे. त्यामुळे यामागील मेंदू शोधला पाहिजे, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली.

वारकरी पांगुरंगाचा अपमान सहन करणार नाही –

मी अशा कृत्याचा निषेध करतो. नरेंद्र मोदींनी, त्यांच्या पक्षातील लोकांनी महाराष्ट्राची आणि वारकरी संप्रदायाची माफी मागावी. इथला वारकरी पांडुरंगाचा अपमान कधीही सहन करणार नाही, असा इशारा मिटकरी यांनी दिला.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -