घरताज्या घडामोडीअमोल मिटकरींच्या अडचणीत वाढ, पुण्यात तक्रार दाखल

अमोल मिटकरींच्या अडचणीत वाढ, पुण्यात तक्रार दाखल

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद मेळाव्यात केलेल्या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. काल ब्राम्हण महासंघाने पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं होतं. मात्र, या प्रकरणात आता अमोल मिटकरी यांच्यावर अकोला, नाशिकनंतर पुण्यातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे मिटकरींच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

पुण्यात तक्रार दाखल

अमोल मिटकरी यांच्याविरोधात पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. चिथोवणीखोर भाषण करून ब्राह्मण समाजातील लोकांच्या भावना दुखावल्यामुळे समाजात तेढ निर्माण केल्याबद्दल त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भारतीय जनता युवा मंचाचे उपाध्यक्ष कुणाल टिळक यांनी मिटकरींविरोधात तक्रार दाखल केली आहे.

- Advertisement -

आमदार मिटकरी यांच्यावर अकोलानंतर आता नाशिकमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. यावेळी महिला आणि ब्राह्मण समाजासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली नाशिकचे साधू महंत आणि ब्राह्मण संघटनेनी तक्रार दाखल केली आहे. तसेच दोन दिवसांत कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या संघटनांनी दिला आहे.

मी कुठल्याही समाजाचा उल्लेख केलेला नाहीये

माझं भाषण जर पूर्ण ऐकलं असेल तर त्यामध्ये कुठल्याही समाजाचा उल्लेख केलेला नाहीये. मी कोणाबद्दलही अपशब्द वापरलेला नाही. मी तिथं एका गावातील कन्यादानाच्या प्रसंगाचं उदाहरण देऊन मंत्रोच्चाराचा उल्लेख केला, असं मिटकरी म्हणाले.

- Advertisement -

मिटकरींच्या या विधानावर भाजपचे नेते, माजी मंत्री गिरीश महाजन यांनी टीका केली आहे. आमदार अमोल मिटकरी सत्ताधारी पक्षाचे आहेत. त्यामुळे उचलली जीभ लावली टाळ्याला असे त्यांनी करू नये, असं गिरीश महाजन म्हणाले.

दरम्यान, अमोल मिटकरी यांनी या वादावर तीन शब्दांचं ट्वीट केलं आहे. यामधून त्यांनी विरोधकांना आणि टिकाकरांना उत्तर दिलं आहे. अमोल मिटकरी यांनी वाचा मौनस्य श्रेष्ठम् ll…असं ट्वीट करत त्यांनी टीकाकरांना उत्तर दिलं आहे. यामधून त्यांनी मौन बाळगणं योग्य असल्याचं म्हटलं आहे.


हेही वाचा : अमोल मिटकरींचं तीन शब्दांत ट्वीट, विरोधकांना दिलं उत्तर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -